न्यूझीलंडचा बांगलादेशवर एक डाव राखून विजय

वेलिंग्टन -रॉस टेलरचे द्विशतक आणि त्यानंतर वॅग्नर-बोल्ट या जोडीने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या बळावर न्यूझीलंडने बांगलादेशवर 1 डाव आणि 12 धावांनी विजय मिळवला. या विजयासह न्यूझीलंडने 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. द्विशतकी खेळी करणाऱ्या रॉस टेलरला सामनावीर घोषित करण्यात आले.

पहिल्या डावात 211 धावांवर डाव संपुष्टात आलेल्या बांगलादेशच्या दुसऱ्या डावाची सुरुवातदेखील खराब झाली. चौथ्या दिवशी 23 षटके बाकी असताना बांगलादेशचा संघ पुन्हा फलंदाजीस मैदानावर उतरला. मात्र, पहिल्याच षटकांत बांगलादेशच्या तमिम इक्‍बालला तंबूत परतावे लागले. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा बांगलादेश 3 बाद 80 धावांवर खेळत होता. या धावसंख्येवरून पुढे खेळताना अखेरच्या दिवशी त्यांना आपल्या धावसंख्येत केवळ 129 धावांचीच भर घालता आली.

यावेळी कर्णधार मोहम्मदुल्लाहने 67 करत काही काळ संघर्ष केला. मात्र, त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. यावेळी न्यूझीलंडच्या नील वॅग्नरचे 5 बळी मिळवत बांगलादेशवर 1 डाव आणि 12 धावांनी विजय मिळवला. त्याआधी न्यूझीलंडचे दोन गडी 38 धावांमध्येच तंबूत परतले होते. मात्र, टेलरने 200 धावा फटकावल्या. यावेळी त्याला हेन्‍री निकोल्सने शतकी खेळी करीत चांगली साथ दिली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)