इन्फोसिस संघाने पटकावले विजेतेपद

पुणे – गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्यानंतर आशय पालकरच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर इन्फोसिस संघाने प्रथम स्पोर्टस आयोजित पुणे आयटी कप टी-20 क्रिकेट स्पर्धेत सिमन्स संघावर सात गडी राखून मात करून विजेतेपद पटकावले.

सिमन्स संघाने दिलेले 127 धावांचे लक्ष्य इन्फोसिस संघाने 17 षटकांत 3 गडींच्या मोबदल्यात पूर्ण केले. नेहरू स्टेडियमवर ही लढत झाली. सिमन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. इन्फोसिस संघाच्या गोलंदाजांनी अचूक मारा करून सिमन्सच्या आघाडीच्या फलंदाजांना झटपट माघारी पाठवले. त्यामुळे सिमन्सची 4 बाद 32 अशी स्थिती झाली होती. यानंतर विशाल रैनाने एका बाजूने किल्ला लढवून सिमन्सला शतकी टप्पा गाठून दिला.

विशालने 50 चेंडूंत 2 चौकारांसह 50 धावा केल्या. त्यामुळे सिमन्सला 20 षटकांत 8 बाद 126 धावा फलकावर लावता आल्या. यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना प्रभज्योत मल्होत्रा अवघ्या चार धावांवर माघारी परतला. यानंतर संदीप शांघई आणि साईनाथ शिंदे एकापाठोपाठ बाद झाले. आशय पालकरने गौरव बाबेलच्या साथीने इन्फोसिसला 3 षटके शिल्लक राखून विजय मिळवून दिला.

आशय-गौरव जोडीने चौथ्या विकेटसाठी 73 धावांची अभेद्य भागीदारी केली. आशयने 42 चेंडूंत 5 चौकारांसह नाबाद 60, तर गौरवने 29 चेंडूंत 2 चौकार व 1 षटकारसह नाबाद 35 धावा केल्या.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)