पुणे -एनइएस रमणबागच्या संघाने एसएसपीएमएसच्या संघाचा 114 धावांनी पराभव करत येथे सुरू असलेल्या छत्रपती शाहु महाराज क्रिकेट ट्रॉफीमध्ये विजयी आगेकूच केली आहे. यावेळी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना रमणबागच्या संघाने निर्धारीत 20 षतकांत 3 बाद 207 धावांची मजल मारत एसएसपीएमएसच्या संघासमोर विजयासाठी 208 धावांचे आव्हान ठेवले.
मात्र, प्रत्युत्तरात खेळताना एसएसपीएमएसच्या संघाला 14.2 षटकांत 93 धावांचीच मजल मारता आल्याने त्यांना 114 धावांनी पराभूत व्हावे लागले. यावेळी प्रथम फलंदाजी करणाऱ्या रमणबागच्या संघातील समर्थ काळभोर आणि साहिल अभंगयांनी एसएसपीएमएसच्या गोलंदाजांची धुलाई करत अनुक्रमे 73 आणि 61 धावांची खेळी केली.
तर, यावेळी त्यांना तब्बल 55 अतिरीक्त धावा आंदन मिळाल्याने दोनशे धावांचा टप्पा गाठण्यात ते यशस्वी ठरले. यावेळी प्रत्युत्तरात खेळणाऱ्या एसएसपीएमएसच्या संघातील तब्बल नऊ फलंदाजांना दुहेरी धावांचा आकडा गाठण्यात अपयश आल्याने त्यांचा डाव केवळ 14.2 षटकांत संपुष्टात आला.