पुणे डॉक्‍टर्स योध्दा, व्हीसीकेडीए पुणे संघांनी उद्घाटनाचा दिवस गाजवला

‘डॉक्‍टर्स प्रीमियर लीग अजिंक्‍यपद’ राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा

पुणे – ठाणे पुणे डॉक्‍टर्स योध्दा, व्हीसीकेडीए पुणे, टायटन सुपर आणि रायगड राजे या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून येथे सुरु असलेल्या पुणे डॉक्‍टर्स असोसिएशन तर्फे आयोजित चौथ्या राज्यस्तरीय “डॉक्‍टर्स प्रीमियर लीग अजिंक्‍यपद’ राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाचा दिवस गाजवला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नेहरू स्टेडियम आणि कटारीया हायस्कूल मैदान येथे आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत अमित मिश्रा याने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पुणे डॉक्‍टर्स योध्दा संघाने कोल्हापुर किलर्स संघाचा 7 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना कोल्हापुर किलर्स संघाने 14.4 षटकात 117 धावांचे आव्हान उभे केले. यामध्ये धीरज पतिकच्या 46 धावांचे मोठे योगदान लाभले. हे आव्हान पुणे डॉक्‍टर्स योध्दाने 14.5 षटकात व 3 गडी गमावून पूर्ण केले.

अमित मिश्रा याने 41 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांसह 59 केल्या. त्याला राहूल बोदाडेने 35 धावा करून उत्तम साथ दिली. दुसर्या सामन्यात अतुल पाटीलच्या 66 धावांच्या जोरावर पुण्याच्या व्हीसीकेडीए पुणे संघाने डब्ल्युडीए ग्लॅडियेटर्स संघाचा 28 धावांनी पराभव केला. हितेश पवारच्या 40 धावांच्या खेळीमुळे ठाणे टायटन सुपर संघाने डीसीसी विटा संघाचा 15 धावांनी पराभव केला. सचिन मोकलच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर रायगड राजे संघाने सुपर स्ट्राईकर्स सांगली संघाचा 3 गडी व 16 चेंडू राखून पराभव केला.

स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेश माने आणि डीपीएलचे अध्यक्ष डॉ.महेश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. अनिल लिंगडे, डॉ. मनोहर जाधव, डॉ. संतोष कवितके, डॉ. सचिन केदार आदि मान्यवर उपस्थित होते. F

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)