सध्याचा भारतीय संघ सर्वोत्तम – नवज्योतसिंग सिध्दू

पुणे – भारतीय क्रिकेट संघाच्या आत्ताच्या कामगिरीनुसार आगामी काळात विश्‍वचषकामध्ये भारतीयांची कामगिरी उत्तम असणार आहे. आतापर्यंच्या क्रिकेटचा संघ पाहता आताचा संघ सर्वोत्तम आहे. संघाचा कर्णधार म्हणून विराट कोहली याचा खेळ उंचावत असून त्याचे मानसिक मनोबलच संघाचा जास्त फायदेशीर ठरणार आहे, असे मत प्रसिद्ध क्रिकेटपटू नवज्योतसिंह सिध्दू यांनी व्यक्‍त केले.

भारती विद्यापीठाच्या कात्रज-धनकवडी येथील शैक्षणिक परिसराला भेट दिली. त्यानंतर आयोजित वार्तालापप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. सिद्ध म्हणाले, कोणताही संघ हा टी-20 अथवा एकदिवसीय सामन्यावरुन सरस ठरत नाही तर त्याचा खरा कस हा कसोटीमध्ये कळत असतो.

कसोटीमध्ये सध्या भारतीय संघ अव्वल दर्जावर असून खेळाडूंची कामगिरी उत्तमोत्तम होत आहे. विराटचे नेतृत्वही संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाणारेच असते. विराटच्या वडिलांच्या निधनानंतर अंत्यसंस्कार केल्यानंतर त्याने रणजीमध्ये शतक ठोकले होते. त्यावरुनच त्याचे मानसिक मनोबल किती आहे हे त्यावरुन कळते. याच विराटच्या मानसिक मनोबलाचा संघाला फायदेशीर ठरणार असून विश्‍वचषकामध्ये नक्कीच भारत करंडक जिंकले, असा विश्‍वास ही त्यांनी व्यक्त केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)