मोहंमद कैफ सहाय्यक प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार

नवी दिल्ली  – भारताचा माजी फलंदाज आणि युपी संघाला रणजी स्पर्धेत पहिले वहिले जेतेपद जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा मोहंमद कैफला दिल्ली डेअर डेव्हिल्स संघाने शुक्रवारी इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) नवीन मोसमासाठी सहायक प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. डेअर डेव्हिल्ससाठी मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज रिकी पॉन्टिंग असणार आहे. याबाबतची घोषणा दिल्ली डेअर डेव्हिल्स संघाने केली आहे.

मोहंमद कैफ हा मागील काही काळापासून दिल्ली डेअर डेव्हिल्स संघाशी निगडीत होता. गेल्या काही मोसमांसाठी त्याने दिल्लीच्या संघासाठी नवीन खेळाडू शोधण्याच्या मोहिमेचा महत्वाचा सदस्य होता. कैफने 2017च्या आयपीएलच्या मोसमात गुजरात लायन्ससंघाचे मुख्य प्रशिक्षक ब्रॅड हॉग यांच्यासह सहाय्यक प्रशिक्षकाचे काम केले होते. त्यामुळे आयपीएलमध्ये प्रशिक्षण करण्याचा त्याला अनुभव आहे. तो यंदाच्या वर्षी दिल्ली डेअर डेव्हिल्स संघाचे प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग आणि जेम्स होप्स यांच्यासह काम करणार आहे. कैफ याने, नवोदीत खेळाडूंना घेऊन उत्तर प्रदेश संघासाठी एकमेव रणजी चषक जिंकल होता. त्या संघात त्याने मेंटॉरची भूमिका देखील बजावली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दिल्ली संघाचा सहायक प्रशिक्षक झाल्यावर तो म्हणाला, दिल्ली संघाशी जोडलो गेल्याने मी खूप आनंदी आहे. त्याचबरोबर मी या संघातील प्रतिभावान नवोदीत खेळाडूंसह काम करण्यास खूप उत्सुक आहे. जे आपल्या या संघाचे आणि देशाचे नाव अभिमानाने पुढे नेणार आहेत. संघव्यवस्थापनातील अनेक कर्मचाऱ्यांच्या मदतीने आम्ही नोवोदित खेळाडूंच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान देऊ. जेणे करून हे खेळाडू आमच्या संघाच्या पाठीचा कणा बनतील.

दिल्ली डेअर डेव्हिल्स संघाचे डायरेक्‍टर मुस्ताफा गौस यावेळी बोलताना म्हणाले, कैफ मुळे आमच्या संघात एका अनुभवी व्यक्तीचे आगमन झाले आहे. त्याला खेळाची उत्तम जाण आहे. त्याचे संघ व्यवस्थापनात असणे खूप चांगले आहे. तो नैसर्गीकपणे नवोदीत खेळाडूंसाठी मेंटॉर म्हणून काम करेल. आम्ही आशावादी आहोत की त्याचा अनुभव आम्हाला या नवीन मोसमात खूप फायद्याचा ठरेल.

काही दिवसांपुर्वीच मोहम्मद कैफने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. 20 वर्षाच्या कारकिर्दीत त्याने 125 एकदिवसीय सामने आणि 13 कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. तर राष्ट्रीय स्तरावर खेळताना त्याने 186 सामन्यात 10,229 धावा बनविल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)