रायुडूच्या गोलंदाजीवर आयसीसीने घातली बंदी

दुबई -आंतराराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने भारतीय खेळाडू अंबाती रायुडूला गोलंदाजी करण्यावर बंदी घातली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याच्या गोलंदाजी शैलीविषयी सामना अधिकाऱ्याने आक्षेप घेतला होता. त्यानंतर त्याला 14 दिवसांत गोलंदजी चाचणी देण्याचे आदेश आयसीसीने दिले होते आणि त्या काळात त्याला गोलदाजी करण्याची मुभा देखील होती. परंतु दिलेल्या कालावधीत रायुडूने गोलंदाजीची चाचणी दिली नाही. त्यामुळे त्याच्यावर बंदी घालण्यात आली आहे.

याबाबत आयसीसीने दिलेल्या स्टेट्‌मेंटमध्ये सांगितले की, 14 दिवसात रायुडूला चाचणी देणे आवश्‍यक होते. परंतु, रायुडूने चाचणीला न उपस्थित राहण्याचा मार्ग स्वीकारला आहे. त्यामुळे त्याला गोलंदाजी करण्यावर बंदी घालण्यात येत आहे. ही बंदी आयसीसीच्या 4. 2 या कलमाच्या आधारे घालण्यात आली आहे. जोपर्यंत तो चाचणी देऊन त्याची गोलंदाजी शैली योग्य असल्याचे सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याच्यावर ही बंदी असेल. रायुडूने नऊ सामन्यांमध्ये गोलंदाजी करताना 3 बळी घेतले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)