सर्फराज अहमदची वर्णभेदी टिप्पणी

File photo

डर्बन  -पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला. परंतु, या सामन्यात पाकिस्तान संघाचा कर्णधार सर्फराज अहमदने आफ्रिकेचा खेळाडू अँडील फेलूकव्हायोवर वर्णभेदी टिप्पणी केली आहे. स्टम्प माईकमुळे हा प्रकार उघडकीस आला असून यामध्ये सर्फराजने , ये काळ्या, तू आज आईला काय प्रार्थना करायला बसवून आला आहेस काय? असे म्हटल्याचे स्टम्प माइकमध्ये रेकॉर्ड झाले आहे.

आयसीसीच्या 2012 मधील वर्णभेद विरोधी कायद्यानुसार खेळाडू, अम्पायर, संघांचा सपोर्ट स्टाफ, सामनाधिकारी यांना त्याचा धर्म, जात, देश, भाषा, रंग, संस्कृती किंवा त्यांचे जन्मस्थळ याबाबत त्याच्यावर टिप्पणी करणे, कृतीतून नाराजी व्यक्त करणे, त्यांना घाबरवणे हे आयसीसीच्या आचारसंहितेच्या विरोधात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)