एनबीएनने गाजवला उद्घाटनाचा दिवस

शिवाजी चषक क्रिकेट स्पर्धा 2018-19

पुणे – हेतन भरडच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर एनबीएन सिंहगड महाविद्यालयाने येथिल ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल्सच्या मैदानावर सुरु असलेल्या शिवाजी चषक स्पर्धेतील उद्घाटनाच्या लढतीत एआयएसएमएसच्या संघाचा पराभव करताना उद्घाटनाचा दिवस गाजवला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सामन्यात प्रथम फलंदाजी करताना एनबीएन संघाने निर्धारीत 17 षटकांत 4 गडी गमावताना 137 धावांची मजल मारली. यावेळी त्यांच्याकडून दत्ता साबळेने नाबाद 41 धावांची खेळी करत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारुन दिली. तर, त्यांच्या संघाला दत्तानंतर अतिरिक्त मिळालेल्या 41 धावांची सर्वात जास्त मदत झाली.

तर, प्रत्युत्तरात खेळणाऱ्या एआयएसएमएसच्यासंघाला निर्धारीत 17 षटकांमध्ये केवळ 115 धावांची मजल मारता आल्याने त्यांना 22 धावांनी पराभुत व्हावे लागले. यावेळी त्यांच्याकडून सागर चौधरीने 43 धावांची खेळी केली. तर, एनबीएन संघाच्या हेतन भरडने 16 धावांत चार गडी बाद करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)