‘ते’ राहुल आणि हार्दिकचे वैयक्तिक मत – कोहली

file photo

त्या वादाचा संघावर कोणताही परिणाम होणार नाही

सिडनी – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने पत्रकार परषदेमध्ये म्हटले की, हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांनी एका कार्यक्रमात काही असभ्यतापुर्ण विधाने केली होती, त्याबाबतीत भारतीय क्रिकेट संघ त्यांच्या बाजूने नाही. परंतु, या घटनांमुळे भारतीय संघाच्या वातावरणात कोणताही परिणाम होणार नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल या दोन्ही खेळाडूंचा भारतीय संभाव्य संघात समावेश आहे. परंतु, बीसीसीआय त्यांच्यावरील कारवाईबाबतचा पुढील निर्णय देत नाही, तोपर्यंत त्यांच्या निवडीबाबत काही सांगू शकणार नसल्याचेही विराटने सांगितले आहे. पुढे बोलताना विराट म्हणाला, ज्या पद्धतीने या दोन खेळाडूंनी विधाने केली त्यांना भारतीय संघ पाठिंबा देत नाही. ते या दोन खेळाडूंचे वैयक्तिक विचार आणि त्याच्या भुमिका आहेत. भारतीय संघाची भुमिका निश्‍चितच वेगळी आहे.

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकाविजय मिळवल्यानंतर अश्‍या घटनांमुळे संघाचे लक्ष्य विचलीत होत आहे काय आणि विश्‍वचषकाच्या तयारीवर याचा कसा परिणाम होत आहे? याबाबत विराटने सांगितले की, जे घडले ते चुकीचे घडले, परंतु काही गोष्टीवर तुम्ही काही करू शकत नाही, कराण ते तुमच्या हातात नसतात. हे खेळाडू भारतीय संघाचा समतोल राखून ठेवण्याच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. परंतु, जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आपणाला प्रतीक्षा करावी लागेल.

बीसीसीआयच्या कार्यकारिणी समितीचे प्रमुख विनोद राय यांनी या दोन खेळाडूंवर दोन सामन्यांच्या बंदीचा ठेवलेला प्रास्ताव मंजुर झाला आहे. त्यामुळे या दोघांना अतिंम संघात स्थान मिळणार नसल्याचे निश्‍चीत
झाले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)