पांड्या-राहुल चौकशी संपेपर्यंत निलंबित

नवी दिल्ली -“कॉफी विथ करण’ या मुलाखतीच्या कार्यक्रमा दरम्यान महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांच्यावर बीसीसीआयने चौकशी संपेपर्यंत निलंबनाची कारवाई केली असून त्यांना पहिल्या सामन्यातून वगळण्यात आले आहे.

प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी दोन्ही क्रिकेटपटूंना दोन सामन्यांची बंदी घालण्याचा प्रस्ताव ठेवला होता, पण तेव्हा एडुल्जी यांनी कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर निर्णय घेण्यास सांगितले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बीसीसीआयच्या कार्यकारिणी समितीच्या सदस्या डायना एडुल्जी यांनी लोकेश राहुल आणि हार्दिक पांड्या यांच्यावर जोपर्यंत बीसीसीआय निर्णय घेत नाही तोपर्यंत त्याच्यावर बंदी घालण्यात यावी अशी शिफारस केली आहे. याअगोदर एडुल्जी यांनी या दोघांची महिलाविरोधी असभ्य टिपण्णीची केस बीसीआयच्या आचार संहितेचा भंग असल्याचे सांगत लिगल सेलकडे पाठवली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)