भारताविरोधात आमची रणनिती तयार – फिंच

गेल्या वर्षभरात विराट कोहली, शिखर धवन आणि रोहित शर्मा या आघाडीच्या तिन्ही फलंदाजांनी 50 पेक्षा जास्त सरासरीने धावा काढल्या आहेत. त्यामुळे भारताच्या या त्रिकुटाला लवकरात लवकर बाद करणे हे आमच्यासमोरचे उद्दीष्ट असणार आहे. असे वक्तव्य ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार ऍरोन फिंचने सामन्यापुर्वी केले आहे.

तसेच पुढे बोलताना तो म्हणाला की, हे तिन्ही फलंदाज मैदानावर टिकले तर ते खोऱ्याने धावा ओढतात आणि मग त्यांना थांबवणे कोणत्याही गोलंदाजासाठी कठीण काम असते. तसेच, या तिघांसोबत भारताच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांपासूनही सावध राहणे गरजेचे असल्याचेही त्याने म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दिनेश कार्तिक, केदार जाधव आणि महेंद्रसिंह धोनी हे फलंदाजही त्यांच्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडल्या आहेत. त्यामुळे पहिल्या तिघांना बाद करण्याच्या नादात या खेळाडूंकडे दुर्लक्ष केले तर अडचणींमध्ये वाढ होउ शकते असेही तो यावेळी म्हणाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)