जेव्हा लायन पुजाराला म्हणतो ,तुला कंटाळा येत नाही का?

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात चेतेश्‍वर पुजाराने 193 धावांची खेळी करून ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना पुरते हैराण केले होते. सलग दोन दिवस खेळपट्टीवर ठाण मांडून पुजाराने भारताच्या डावाला आकार दिला.

ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी पुजाराला बाद करण्याचे भरपूर प्रयत्न केले. मात्र, त्यांना यात फारसे यश मिळाले नाही. यावेळी गोलंदाजी करून करून थकलेला ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायनने कंटाळून पुजाराला प्रश्‍न विचारला, एवढा वेळ फलंदाजी करतो आहेस, तुला कंटाळा येत नाही का? यावर पुजाराने केवळ हसून त्याला प्रत्युत्तर दिले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)