चुकांमधुन शिकण्याची गरज – मयंक अग्रवाल

सिडनी  – भारतीय संघाचा नवोदीत सलामीवीर मयंक अग्रवालने ऑस्ट्रेलिया येथे सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील चौथ्या कसोटी मालिकेत 77 धावांची खेळी करुन संघाला चांगली सुरूवात करुन दिली. मात्र, लागोपाठ दोनवेळा अर्धशतक झळकावल्यानंतर तो बाद झाला. यावेळी पहिल्या दिवसाचा खेळ थांबल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांना मयंक म्हणाला की, सलग दुसऱ्यांदा मी माझ्या खेळाला शतकी खेळीत परावर्तीत करण्यात चुकलो. त्यामुळे आता लवकरात लवकर मला माझ्या चुकांमधून शिकणे गरजेचे असून त्याच त्याच चुका आता टाळाव्या लागतील.

भारतीय संघाने चौथ्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्नय घेतला. मात्र, लोकेश राहुल स्वस्तात परतल्यानंतर मयंकने चेतेश्‍वर पुजाराच्या साथीत संघाचा डाव सावरताना दुसऱ्या गड्यासाठी 116 धावांची भगिदारी नोंदवली. यावेळी मयंक अग्रवालची खेली पहाता तो आपले पहिले कसोती शतक साजरे करेल असे वाटत असताना नॅथन लायनच्या चेंडूवर षटकार मारण्याच्या नादात तो बाद झाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी बोलताना तो म्हणाला, चांगली सुरूवात केल्यानंतर त्या खेळीचे मोठ्या खेळीत रुपांतर करण्यात मी अपयशी ठर्लो. त्याचे मला खुप वाईत वाटत आहे. खराब फटका मारुन बाद झाल्या मुळे मी स्वताःवर संतापलो देखिल आहे. मी नॅथन लायनवर दबाव आनायचा प्रयत्न करत होतो. मात्र, माझी चाल यशस्वी ठरली नाही. त्यामुळे मी माझ्याच चुकीने बाद झालो याचे मला खुप दुखः होत आहे.

गेल्या काही दिवसांपुर्वी न्युझिलंड अ संघा विरुद्ध मी अश्‍याच प्रकारच्या मैदानावर खेळलो आहे. तेथे देखिल अश्‍याच प्रकारे चेंडू उसळी घेत होता. त्या मैदानावर फलंदाजी करणे अवघड होते. तश्‍याच प्रकारचे मैदान येथे आहे. मात्र, न्युझिलंड अ संघापेक्षा ऑस्ट्रेलियन संघातील वेगवान गोलंदाजांचा सामना करणे अवघड आहे.

सामन्यात ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजांनी वेगवान बाऊंसर्सचा मारा केला त्यावेळी काही समजायच्या आत चेंडू एकतर हेल्मेटवर आदळत होता. किंवा यष्टीरक्षका पर्यंत पोहोचत होता. त्यामुळे पहिल्या सत्रात आम्ही केवल सावध खेळ करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दुसऱ्या सत्रात त्यांची गोलंदाजी समजायलालागल्यावर आम्ही धावांचा वेग थोडा वाढवण्याचा निर्नय घेतला असेही त्याने यावेळी सांगितले.

पुजारा कडून शिकतो आहे – हनुमा

पुजारा सोबत फलंदाजी करताना त्याच्या कडून सावध खेल करण्याची कला शिकत असून आपली विकेट कश्‍या प्रकारे वाचवायचे हे मी त्याच्या कडून शिकतो आहे. असे हनुमाने यावेळी सांगितले. तसेच तो पुढे म्हणाला की, पुजाराची फलंदाजी पहाण्यात वेगळाच आनंद आहे. तो गोलंदाजांना कश्‍या प्रकारे सामोरे जातो आणि त्यांना कश्‍या प्रकारे थकवतो आणि वाईट चेंडूची वाट पाहातो आणि त्याच्यावरच धावा वसूल करतो त्यामुळे त्याला बाद करणे सर्वात अवघड आहे असे मला वाटते, असेही तो यावेळी म्हणाला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)