#AUSvIND : बुमराहने मोडला 41 वर्षांपुर्वीचा विक्रम

मेलबर्न – बॉक्‍सिंग डे कसोटी सामन्यात भारताच्या बुमराहने 6 गडी बाद करत ऑस्ट्रेलियाचा संघ 151 धावांत गारद केला. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर भारतीय गोलंदाजाकडून केलेली ही उत्कृष्ट कामगिरी झाली आहे.

या कामगिरीसह बुमराहने 41 वर्षापूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे. या आधी या मैदानावर भारताच्या बीएस चेंद्रशेखर यांनी 1977 मध्ये 52 धावांच्या मोबदल्यात सहा गडी बाद केले होते. बुमराहने हा विक्रम मोडीत काढला आहे. बुमराहाने 33 धावांच्या मोबदल्यात सहा गडी बाद केले. बुमराहने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात पाच डावांत 17 बळी घेतले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बुमराहाने मार्कस हॅरीस, शॉन मार्श, ट्रेव्हिस हेड, टिम पेन, नॅथन लायन आणि जोश हेजलवूड यांना बाद केले. बुमराहने 15.5 षटकांमध्ये 33 धावांच्या मोबदल्यात सहा गडी बाद केले आहेत. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवरील आतापर्यंतची ही सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. ऑस्ट्रेलियातील ही भारतीय गोलंदाजाची चौथी सर्वोत्तम कामगिरी आहे. या विक्रमात कपिल देवने 8 गडी बाद करत 106 धावा दिल्या होत्या. तर, अनिल कुंबळेने 141 धावांच्या मोबदल्यात 8 गडी बाद केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)