कॅग्निझंट, टीसीएस संघांची आगेकुच

अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट स्पर्धा

पुणे – कॅग्निझंट संघाने ऍमडॉक्‍स्‌ संघाचा तर टीसीएस संघाने विप्रो संघाचा पराभव करताना येथे सुरू असलेल्या आयडीयाज्‌ अ सास कंपनी यांच्या तर्फे स्वर्गीय अंकुर जोगळेकर यांच्या स्मरणार्थ आयोजित 15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत विजयी आगेकुच नोंदवली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

व्हिजन क्रिकेट अकादमी मौदान येथे झालेल्या सामन्यात अमन वाणीच्या आक्रमक गोलंगाजीच्या जोरावर कॅग्निझंट संघाने ऍमडॉक्‍स्‌ संघावर 9 गडी राखून मोठा वीजय मिळवला. पहिल्यांदा खेळताना प्रथमेश देशपांडे व अमन वाणी यांच्या आक्रमक गोलदाजीपुढे ऑमडॉक्‍स्‌ संघ केवळ 14.1 षटकांत सर्वबाद 108 धावांमध्येच गारद झाला. 109 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेलुया कॉग्निझंटच्या नितेश सप्रेच्या नाबाद अर्धशतकी खोळीच्या जोरावर त्यांनी हे आव्हान 14.4 षटकांत 1 बाद 113 धावा करताना सहज पुर्ण केले. यावेळी 15 धावांत 4 गडी बाद करणारा अमन वाणी सामनावीर ठरला.

तर, दुसऱ्या सामन्यात गौरव भोलेरावच्या आक्रमक फलंगाजीच्या बळावर अतीतटीच्या झालेल्या सामन्यात टीसीएस संघाने विप्रो संघाचा 4 धावांनी पराभव केला. पहिल्यांदा खेळताना टीसीएस संघाने 20 षटकांत 7 बाद 164 धावा केल्या. यात गौरव भोलेरावने 45 चेंडूत 63 धावा केल्या. 164 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रवीकिरण बायदची अर्धशतकी खेळी विप्रो संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. यावेळी मयंक जसोरे, गौरव सिंग व अभिनव कालिया यांच्या अचूक गोलंदाजीने विप्रो संघाचा डाव 20 षटकांत 8 बाद 160 धावांत रोखत टीसीएस संघाने 4 धावांनी निसटता विजय संपादन केला.

सविस्तर निकाल- साखळी फेरी

ऍमडॉक्‍स्‌ – 14.1 षटकांत सर्वबाद 108 (रोहित लालवानी 33, अंकित खरे 28, भावनेश कोहली 21, प्रथमेश देशपांडे 4-31, अमन वाणी 4-15) पराभूत वि कॅग्निझंट- 14.4 षटकांत 1 बाद 113 (नितेश सप्रे नाबाद 50, करण केसरकर 21, विस्माव सुद नाबाद 24, भावनेश कोहली 1-11).

टीसीएस- 20 षटकांत 7 बाद 164 (गौरव भोलेराव 63, सुनिल बाबर 38, विशाल हिरगुडे 2-20) वि.वि विप्रो- 20 षटकांत 8 बाद 160 (अक्षय जगदाळे 35, रवीकिरण बायद 54, मयंक जसोरे 3-11, गौरव सिंग 2-23, अभिनव कालिया 2-27).


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)