वसंत रांजणे-11 व भाऊसाहेब निंबाळकर-11 यांच्यात विजेतेपदासाठी लढत

दुसरी शरदचंद्रजी पवार प्रौढ करंडक क्रिकेट स्पर्धा

पुणे – पराग चितळेच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर वसंत रांजणे इलेव्हन संघाने राजू भालेकर संघाचा 4 गडी राखून पराभव करत येथे सुरू असलेल्या साई9स्पोर्टस यांच्या तर्फे आयोजीत दुसऱ्या शरदचंद्रजी पवार प्रौढ करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला असून अंतीम फेरीत वसंत रांजणे इलेव्हन व भाऊसाहेब निंबाळकर इलेव्हन यांच्यात विजेतेपदासाठी लढत होणार आहे.

नेहरू स्टेडीयम क्रिकेट मैदानावर झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजू भालेकर इलेव्हन संघाने 15 षटकांत 8 बाद 79 धावा केल्या. यात अभिजित फरांदे 17, विनायक द्रविड 16, नितीन हार्डीकर 22 यांनी धावा काढून संघाच्या डावाला आकार दिला.

वसंत रांजणे इलेव्हनसंघाकडून पराग चितळे 3-18, विवेक मालशे 3-11 यांनी प्रत्येकी तीन गडी बाद करून राजू भालेकर इलेव्हन संघाचा निम्मा संघ तंबूत परत पाठविला. 79धावांचे आव्हान वसंत रांजणे इलेव्हन संघाने 14.3 षटकात 6बाद 83धावा करून पूर्ण केले. यात पराग चितळेने गोलंदाजीप्रमाणेच फलंदाजीतही कमाल दाखवत नाबाद 21 केल्या. परागला अशोक उत्तेकरने नाबाद 16 धावा व सचिन शामल 13धावा काढून सुरेख साथ दिली. सामन्याचा मानकरी पराग चितळे ठरला.

सविस्तर निकाल- साखळी फेरी

राजू भालेकर इलेव्हन: 15 षटकांत 8 बाद 79 (अभिजित फरांदे 17, विनायक द्रविड 16, नितीन हार्डीकर 22, पराग चितळे 3-18, विवेक मालशे 3-11, मोहन जाधव 1-22) पराभूत वि. वसंत रांजणे इलेव्हन: 14.3 षटकांत 6 बाद 83 (पराग चितळे नाबाद 21, अशोक उत्तेकर नाबाद 16, सचिन शामल 13, मंदार दळवी 4-6, अनिल छाजेड 1-9).


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)