व्हेरॉक अकादमी संघ अंतिम फेरीत दाखल

पीवायसी करंडक 14 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धा

पुणे : व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने क्‍लब ऑफ महाराष्ट्र संघाचा पराभव करत येथे सुरु असलेल्या पीवायसी हिंदु जिमखाना क्‍लब यांच्या तर्फे पीवायसी करंडक 14 वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
डेक्कन जिमखाना क्रिकेट मैदानावर झालेल्या दुस-या उपांत्य फेरीच्या लढतीत प्रसन्न पवारच्या 62 धावांच्या बळावर व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने क्‍लब ऑफ महाराष्ट्र संघाचा 7 गडी राखून दणदणीत पराभव करत अंतिम फेरी गाठली.

-Ads-

पहिल्यांदा खेळताना क्रिश शहापुरकरच्या एकाकी 85 धावांच्या जोरावर क्‍लब ऑफ महाराष्ट्र संघाने 45 षटकात 8 बाद 147 धावा केल्या. व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाच्या कबीर भट्टचार्जीने 35 धावात 2 गडी बाद करत क्‍लब ऑफ महाराष्ट्र संघाचा डाव 147 धावांत रोखला. 147 धावांचे आव्हान प्रसन्न पवारच्या 62, शार्दुल विनोदेच्या 34 व वैभव अगमच्या नाबाद 24 धावांच्या बळावर व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने केवळ 27.4 षटकात 3 बाद 150 धावा करून सहज पुर्ण करत अंतिम फेरीत धडक मारली.

संक्षिप्त धावफलक : उपांत्य फेरी –

क्‍लब ऑफ महाराष्ट्र- 45 षटकांत 8 बाद 147 (क्रिश शहापुरकर 85, विवेक टिपरे 17, कबीर भट्टचार्जी 2-35, भार्गव महाजन 1-35, ओंकार राजपुत 1-34, साहिल सावंत 1-6) पराभूत विरुद्ध व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी – 27.4 षटकांत 3 बाद 150 (प्रसन्न पवार 62, शार्दुल विनोदे 34, वैभव अगम नाबाद 24, साहिल कड 1-26, पार्थ कांबळे 1-55, तेजस शिंदे 1-25)

सामनावीर- प्रसन्न पवार.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)