मोहम्मद शेहजादची वादळी खेळी

file pic

16 चेंडूतच केल्या 74 धावा

शारजा – दुबई येथे सुरू असलेल्या टी10 लीग क्रिकेट स्पर्धेत अफगाणच्या मोहम्मद शहजादने केवळ 16 चेंडूत 74 धावांची वादळी खेळी केली आहे. विशेष म्हणजे मोहम्मद शहजादने केलेल्या फटकेबाजीने त्याचा संघाने अवघ्या चार षटके आणि फक्त 17 मिनीटांमध्येच विजय संपादन केला.

टी 10 लिग ही 10-10 षटकांच्या क्रिकेट सामन्यांची मालिका आहे. अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू या स्पर्धेत खेळतात. राजपूत आणि सिंधी या दोन संघांमध्ये झालेल्या सामन्यात सिंधींनी पहिल्यांदा फलंदाजी करत 10 षटकांमध्ये 94 धावा केल्या.

95 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानावर उतरलेल्या शहाजादने पहिल्या चेंडू पासूनच चौकारांची आणि षटकारांची आतिषबाजी केली. यावेळी त्याने आठ षटकार आणि सहा चौकार ठोकत 12 चेंडुंमध्येच आपले अर्धशतक पूर्ण केले तर 16 चेंडूंमध्ये 74 धावा केल्या. शहजादच्या या आक्रमक खेळीच्या जोडीवर राजपूतांनी केवळ चार षटकांमध्येच 95 धावांचे लक्ष्य पूर्ण केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)