भारतीय संघासमोर विजय मिळवण्याचे आव्हान

भारत विरुद्ध वेस्ट इंडीज एकदिवसीय क्रिकेट मालिका

पुणे  – येथे आज भारत विरुद्ध वेस्ट इंडीज दरम्यान सुरु असलेल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतील तिसरा सामना खेळवला जाणार असून मालिकेत आता पर्यंत दोन सामन्यांमधिल पहिला सामना भारताने जिंकला आहे तर दुसरा सामना बरोबरीत सुटल्याने मालिकेत 1-0 अशी आघाडी असलेल्या भारतीय संघासमोर सामन्यात विजय मिळवून ही आघाडी 2-0 अशी वाढविण्याचे आव्हान असणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारत विरुद्ध विंडीज दरम्यान झालेल्या कसोटी मालिकेत भारताने विंडीजचा एकतर्फी पराभव करताना वर्चस्व गाजवले होते. मात्र, एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत विंडीजने दमदार पुनरागमन करताना पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय गोलंदाजांची मनसोक्त धुलाई करताना 300 धावांचा टप्पा पार केला होता. ज्यात पहिल्या सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला तर दुसऱ्या सामन्यात त्यांचा थोडक्‍यात पराभव झाला.

वेस्ट इंडीजच्या संघात तरूण खेळाडू चांगला खेळ करीत आहेत. हेतमायर, होप, चंद्रपॉल, पॉवेल या खेळाडूंकडे चांगली क्षमता आहे. त्याबरोबर कर्णधार होल्डर, सॅलयुअल्स, रोच हे अनुभवी खेळाडू संघात आहेत. यातच हेतमायर आणि होप यांनी पहिल्या दोन सामन्यात आपली चमक दाखवून दिली आहे. परंतु इतर खेळाडूंनी देखील त्यांना साथ देणे तेवढेच गरजेचे आहे.

हेतमायरने आत्तापर्यंत आपल्या आक्रमक खेळाने भारतीय गोलंदाजांच्या नाकी नऊ आणले आहेत. पण गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात मात्र त्यांचा संघ कमी पडताना दिसत आहे. त्याच बरोबर विराट साठी त्यांना स्वतंत्र रणनिती आखण्याची आणि ती आंमलात आणन्याची आवश्‍यकता आहे. संघात स्थान टिकवायचे असल्यास धोनीने कामगिरीत सुधारणा करणे गरजेचे असून त्याच्या साठी आगामी विश्‍वचषक आणि ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यामध्ये स्थान मिळवण्यासाठी हि शेवटची संधी असणार आहे.

प्रतिस्पर्धी संघ –

भारत – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, अंबाती रायुडू, मनीष पांडे, महेंद्रसिंग धोनी, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, खलील अहमद, भुवनेश्वर कुमार, केएल. राहुल, जसप्रित बुमराह आणि उमेश यादव.

वेस्ट इंडीज – जेसन होल्डर (कर्णधार), फॅबिएन ऍलन, सुनिल अंबरीस, देवेंद्र बिशू, चंद्रपॉल हेमराज, शिमरॉन हेतमायर, शाई होप, अल्झारी जोसेफ, एविन लुइस, ऍश्‍ले नर्स, किमो पॉल, रोव्हमन पॉवेल, केमार रोच, मार्लोन सॅम्युएल्स, ओश्‍ने थॉमस.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)