महागड्या तिकीट आणि प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थीतीमुळे प्रेक्षकांची सामन्याकडे पाठ

कोलकाता : भारत – विंडीज टी-20 मालिकेतील पहिला ट्‌वेंटी -20 सामना रविवारी कोलकाता येथील प्रसिद्ध इडन गार्डन स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. मात्र, या सामन्याकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.

या सामन्याच्या मोफत तिकिटही घ्यायला कोणी उत्सुक नाही. आजीवन, संलग्न आणि वार्षिक सभासद असे एकूण 25000 सदस्य आहेत. त्यापैकी केवळ 8000 सदस्यांनी तिकीट घेतले आहेत. रविवारी होणाऱ्या सामन्यात स्टेडियम पूर्णपणे भरण्याची शक्‍यता कमी आहे, असे बंगाल असोसिएशनच्या सुत्रांनी सांगितले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

इडन गार्डन स्टेडियमची प्रेक्षकक्षमता 66 हजार आहे. त्यात बंगाल असोसिएशनकडून 15000 तिकीटं मोफत देण्यात येणार आहेत. दोन्ही संघात प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती या सामन्यातील अत्यल्प प्रतिसादाला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. त्यात या सामन्याच्या तिकिटांची किंमत ही 650, 1300 आणि 1900 अशी आहे. त्यामुळेही इतके महाग तिकीट खरेदी करून कोणी येऊ इच्छित नाही. तीन तासांच्या सामन्यासाठी हे महागडे तिकीट आहे, असेही एका सदस्याने यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)