महिला टी-20 : भारतीय महिला संघाचा श्रीलंकेवर दणदणीत विजय

तिसऱ्या विजयासह टी-20 मालिकाही जिंकली

कोलंबो: अष्टपैलू खेळाडू अनुजा पाटील हिच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने चौथ्या टी-20 सामन्यात श्रीलंकेवर 7 विकेट राखून विजय संपादित केला. भारतीय संघाचा हा  सलग तिसरा विजय ठरला. या विजयासह भारतीय महिला संघाने पाच सामन्याची टी-20 मालिकेत 3-0 अशी आघाडी घेतली आहे.

-Ads-

अनुजा पाटील हिने श्रीलंकेचे तीन फलंदाज बाद करण्याबरोबरच फलंदाजीत सुध्दा आपली कामगिरी दाखविली. तिने नाबाद 54 धावांची खेळी करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तिने जेमिमा रोड्रीगेज (नाबाद 52) हिच्या सोबत चौथ्या विकेटसाठी 96 धावांची भागिदारी केली.

पावसामुळे मॅच उशीरा सुरू झाल्याने 17 षटकांचा सामना खेळविण्यात आला. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून  क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. श्रीलंकेने 17 षटकांत 5 विकेट गमावत 134 धावा केल्या.  भारताने 15.4 षटकांत 3 बाद 137 धावा करत फटकावून आकर्षक विजयाची नोंद केली. अनुजा हिने 42 चेंडूत 54  धावा तर रोड्रीगेज हिने 37 चेंडूत 52 धावा केल्या. श्रीलंकेकडून अोशादी रणसिंघे हिने 3 विकेट घेतल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
4 :thumbsup: Thumbs up
3 :heart: Love
1 :joy: Joy
1 :heart_eyes: Awesome
6 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)