#NZvIND : विजयीमार्गावर परतण्यास भारत उत्सुक

मार्टिन गुप्टिलच्या दुखापतीने वाढवली न्यूझीलंडची चिंता

सामन्याची वेळ : सकाळी 7.30 पासून
स्थळ : वेलिंग्टन

वेलिंग्टन  -विराट कोहलीच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या भारतीय संघाला चौथ्या सामन्यात लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर अखेरच्या सामन्यात विजय मिळवून विजयी मार्गावर परतण्यास भारतीय संघ उत्सुक असून तिसऱ्या आणि चौथ्या सामन्याला दुखापतीमुळे मुकलेला माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी अखेरच्या सामन्यात उपस्थित असणार आहे. पाच सामन्यांची मालिका भारताने आधीच 3-1 अशा फरकाने जिंकली असून चौथ्या सामन्यात पराभूत झाल्याने भारतीय संघापुढे आपली विजयीलय पुन्हा मिळविण्याचे आव्हान असून पाचवा सामना जिंकून न्यूझीलंडला आपली प्रतिष्ठा जपण्याचे आव्हान असणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने पहिले तीनही सामने भारतीय संघाने एकतर्फी जिंकल्यानंतर चौथ्या सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. चौथ्या सामन्यात भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद 92 धावांचीच मजल मारता आली होती. त्यानंतर भारतीय संघावर सर्व स्तरातून टीका केली जाऊ लागली. चौथ्या सामन्यातील भारतीय संघाचा पराभव इतिहासातील संघाचा सर्वात मोठा पराभव समजला जात आहे. कारण न्यूझीलंडने तो सामना तब्बल 212 चेंडू आणि आठ गडी राखून जिंकला होता. यावेळी त्या सामन्यात ट्रेंट बोल्ट आणि कॉलिन डी ग्रॅन्होमने भारतीय फलंदाजांना खेळपट्टीवर टिकाव धरू दिला नाही.

ट्रेंट बोल्टने पाच तर ग्रॅन्होमने 3 बळी मिळवत भारतीय संघाला शंभरीदेखील गाठू दिली नव्हती. तर, अखेरच्या एकदिवसीय सामन्यात यजमान न्यूझीलंड संघाला मोठा धक्‍का बसला आहे. सलामीवीर फलंदाज मार्टिन गुप्टिल दुखापतीमुळे अखेरच्या सामन्याला मुकण्याची शक्‍यता आहे. अतिरिक्‍त सलामीवीर म्हणून न्यूझीलंड संघात कॉलिन मुन्‍रोला बोलवण्या आले आहे. गुप्टिलच्या दुखापतीवर उपचार सुरू असून तो फिजिओच्या निरीक्षणाखाली आहे.

तत्पूर्वी, पहिल्या तीनही सामन्यांमध्ये न्यूझीलंडला भारतीय गोलंदाजांसमोर टिकाव धरता आला नव्हता. यावेळी पहिल्या दोन्ही सामन्यात भारतीय फिरकी गोलंदाजांनी तर तिसऱ्या सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या संघाला धावा करू दिल्या नव्हत्या. त्यातल्या त्यात चारही सामन्यात न्यूझीलंडच्या सलामीवीरांसह त्यांच्या कर्णधाराला धावा करण्यात सातत्याने अपयश येते आहे. त्यामुळे त्यांना मालिकेत एकतर्फी पराभूत व्हावे लागले होते.

मात्र, चौथ्या सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन करत भारतीय संघाचा एकतर्फी पराभव करत मालिकेत पुनरागमन केले आहे. त्यामुळे अखेरच्याही सामन्यात त्यांच्याकडूनही अशाच खेळाची अपेक्षा केली जात आहे. तर, दुसरीकडे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दौऱ्यानंतर फॉर्मात असलेल्या भारतीय सलामीवीर आणि मधल्या फळीतील फलंदाजांना चौथ्या एकदिवसीय सामन्यात अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती त्यामुळे भारताला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला होता.

त्यात तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी अनुपस्थित होता त्यामुळे भारतीय संघाची मधली फळी लवकर कोलमडली. तर, आज होणाऱ्या सामन्यासाठी धोनी संघात उपस्थित राहणार असल्याची शक्‍यता वर्तविण्यात आलेली असल्याने भारतीय संघाची मधली फळी पुन्हा एकदा स्ट्रॉंग झाली आहे.

प्रतिस्पर्धी संघ – भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, भुवनेश्‍वर कुमार, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, विजय शंकर, शुभमन गिल, खलील अहमद, युझवेंद्र चहल, हार्दिक पांड्या.

न्यूझीलंड : केन विल्यमसन (कर्णधार), टॉम लॅथम, कॉलिन मुन्‍रो, हेन्‍री निकोल्स, मिचेल सॅंटनर, टीम साउदी, रॉस टेलर, कॉलिन डीग्रॅंडहोम, ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन, मॅट हॅन्री, जेम्स निशाम, मार्टिन गुप्टिल आणि टॉड ऍस्टल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)