लंडन – भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान सुरू असलेल्या पाचव्या कसोटीच्या अखेरच्या दिवशी उपहारापर्यंत भारताच्या 5 बाद 167 धावा झालेल्या आहेत. इंग्लंडने भारतासमोर 464 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

सामन्याच्या अखेरच्या दिवशी आज अंजिक्य रहाणे आणि हनुमा विहारी या दोन फलदांजाना बाद करण्यात इंग्लंड गोलदांजाना यश आले आहे. 464 धावांचे लक्ष्य पाहता भारताला हा सामना जिंकणे अवघड आहे. भारताला जिंकण्यासाठी आणखी 297 धावांची आवश्यकता आहे. आज जोरदार पाऊस किंवा एखादा चत्मकारच भारताला पराभूत होण्यापासून वाचवू शकतो.

पाचव्या दिवशी उपहारासाठी खेळ थांबला तेव्हा के एल राहुल 108 आणि ऋषभ पंत 12 धावांवर खेळत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)