भारताचे वेस्टइंडिज समोर 378 धावांचे लक्ष्य

मुंबई – रोहित शर्मा आणि अंबाति रायुडू यांच्या शतकांच्या जोरावर भारताने वेस्टइंडिजसमोर 378 धांवाचे लक्ष्य ठेवले आहे. भारताने 50 षटकांत 5 बाद 377 धावा केल्या. भारताचा सलामीवीर रोहित शर्मा याने 137 चेडूंत (20 चौकार आणि 4 षटकार) 162 धावा केल्या. तर विराट कोहली हा 16 धावांवर बाद झाल्यानंतर फलंदाजीस आलेल्या अंबाती  रायुडू याने 81 चेंडूत ( 8 चौकार आणि 4 षटकार) 100 धावा करत महत्वाची भूमिका पार पाडली.

मुबंईतील वेस्ट इंडिज विरूध्दच्या चौथ्या सामन्यात रोहित शर्माने याने 21 वे शतक तर अंबाती रायुडू याने कारकिर्दीतील तिसरे शतक आज साजरे केले. भारतीय फलंदाजीमध्ये सलामीवीर शिखर धवन याने 38 धावा केल्या. एम.एस. धोनी याने 23 धावा केल्या. केदार जाधवने नाबाद 16 तर रविंद्र जडेजाने नाबाद 7 धावा केल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तत्पूर्वी भारतीय संघाचा कर्णधार  विराटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारतीय फलंदाजाने विराटचा फलंदाजीचा  निर्णय योग्य ठरवला असून आता भारतीय गोलंदाज काय भूमिका पार पडणार हे पहावे लागणार आहे. गोलंदाजीचा धूरा रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, जसप्रीत बुमराह यांच्यावर असणार आहे.

दरम्यान, पहिल्या सामन्यात भारतीय संघाने मिळविलेल्या धडाकेबाज विजयानंतर वेस्ट इंडिजने आगामी दोन्ही सामन्यांमध्ये जोरदार पुनरागमन करताना दुसरा सामना अनिर्णीत राखला तर तिसऱ्या सामन्यात तब्बल 43 धावांनी विजय मिळवत मालिकेवर वर्चस्व गाजवले असून आजच्या सामन्यात भारतीय संघ विजयीरथावर परतण्यास उत्सूक असणार असून विंडीजचा संघ सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)