कॉर्पोरेट सुपर 9 टी-20 क्रिकेट स्पर्धेत 32 संघांचा सहभाग

पुणे – स्पोर्टीलव व महाराष्ट्र क्रीडा यांच्या तर्फे 6 व्या कॉर्पोरेट सुपर 9 टी-20 क्रिकेट स्पर्धेत कॉर्पोरेट क्षेत्रातील 32 संघ सहभागी झाले आहेत. हि स्पर्धा सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, लवळे क्रिकेट मैदान येथे पार पडणार आहे.

स्पर्धेत एकूण 32 संघ सहभागी झाले असून यामध्ये टेक महिंद्रा, फुजित्सु, एसक्‍यूएस-इंडिया, एम्प्टोरीज, ऍमडॉक्‍स, अर्न्स्ट अँड यंग, सेल 2 वर्ल्ड, जी.एस महानगर बॅंक, व्हिवीक्‍स, जे 1, कॅलसॉफ्ट, इलेमेन्ट 5, सीएसके ग्लोबल, राईजस्मार्ट, वेंकीज, एचडीएफसी बॅंक, आयप्लेस इंडीया, नेटसर्फ, इन्फोस्ट्रेच, अबील, युनियन बॅंक, सारस्वत बॅंक, सॉफ्टहार्ड ऑटोमेशन, टीमस्प्रिंग, गालाघर,बीएमसी सॉफ्टवेअर, गंगा सिटींगज्‌, बीएनआय पुणे वेस्ट, सिनेपटेक, ब्लेजक्‍लेन, गोदरेज प्रॉपर्टीज यांचा समावेश आहे.

स्पर्धेचे सामने साखळी व बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. तसेच, साखळी फेरीत प्रत्येक संघ 3 सामन खेळणार असून प्रत्येक गटांतील अव्वल दोन संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक व 35हजार रुपये, तर उपविजेत्या संघाला करंडक व 20हजार रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. याशिवाय मालिकावीर खेळाडूला करंडक व 10हजार रुपये, सर्वोत्कृष्ट फलंदाज व गोलंदाज यांना प्रत्येकी 5 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)