ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर

नवी दिल्ली – भारतीय संघ 10 फेब्रुवारीपर्यंत न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. त्यानंतर भारतीय संघ मायदेशात ऑस्ट्रेलियाचा सामना करणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात भारत दौऱ्यावर येणार आहे.

भारतात ऑस्ट्रेलिया तीन ट्‌वेंटी-20 आणि एकदिवसीय सामने खेळणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या मालिकेचे वेळापत्रक गुरुवारी जाहीर केले आहे. ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याची सुरुवात ट्‌वेंटी-20 सामन्यांनी होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

24 आणि 27 फेब्रुवारीला अनुक्रमे बंगळुरु व विझाग येथे हे सामने होणार आहेत. त्यानंतर 2 ते 13 मार्च या कालावधीत पाच एकदिवसीय सामने हैदराबाद, नागपूर, रांची, मोहाली आणि नवी दिल्ली येथे होतील.

मालिकेचे वेळापत्रक पुढील प्रमाणे –

टी20 मालिका :

24 फेब्रुवारी पहिला टी-20 सामना, बंगळूरू;

27 फेब्रुवारी दुसरा टी-20 सामना, विशाखापट्टणम

एकदिवसीय मालिका :

2 मार्च पहिला वन-डे सामना, हैदराबाद;

5 मार्च पहिला वन-डे सामना, नागपूर;

8 मार्च पहिला वन-डे सामना, रांची;

10 मार्च पहिला वन-डे सामना, मोहाली;

13 मार्च पहिला वन-डे सामना, दिल्ली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)