घरांच्या विक्रीत वाढ झाल्याचा क्रेडाईचा दावा

संग्रहित छायाचित्र...

विविध संस्थांकडून घरांच्या विक्रीची वेगवेगळी आकडेवारी

बर्लिन: पहिल्या सहा महिन्यात भारतातील सात मोठ्या शहरातील घराच्या विक्रीत 25 टक्‍क्‍यांनी वाढ झाल्याचा दावा क्रेडाई आणि जेएलएलच्या संयुक्‍त अभ्यास अहवालात करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

क्रोडाईच्या येथे होत असलेल्या 19 व्या जागतिक परिषदेत हा अहवाल जाहीर करण्यात आला. या परिषदेला 1000 विकसक सहभागी झाले आहेत. सर्व शहरात आता विक्री वाढत असल्याची लक्षणे दिसून येत असल्याचे जेएलएल इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश नायर यांनी सांगितले.

ते म्हणाले की, यावर्षी पहिल्या सहा महिन्यात या सात शहरात 64080 इतक्‍या घरांची विक्री झाली आहे, जी की गेल्या वर्षी पहिल्या सहा महिन्यात केवळ 51452 इतकी होती. तयार घराची संख्या वाढल्यानंतर विकसकांनी घराचे दर कमी करण्याबरोबरच काही सवलती दिल्यामुळे कुंपनावर बसून असलेले ग्राहक आता खरेदी करू लागले असल्याचे वातावरण आहे. गेल्या तीन ते चार वर्षापासून रिऍल्टी क्षेत्रात मरगळ आहे. मात्र, आता ती कमी होण्याची लक्षणे दिसू लागली असल्याचा दावा त्यांनी केला.

या अहवालावेळी पुण्यासह, मुंबई, दिल्ली, कोलकात्ता, चेन्नई, हैदराबाद, बंगळुरूतील घराच्या विक्रीचा आढावा घेण्यात आला. या अहवालात घराच्या विक्रीत 25 टक्‍क्‍यांनी वाढ झाल्याचा दावा करण्यात आला असतानाच गेल्या पंधरवडयात जाहीर करण्यात आलेल्या नाईट फ्रॅंकच्या अहवालात मात्र घराची विक्री केवळ 3 टक्‍क्‍यानी वाढून ती 1.24 लाख युनिटस्‌ इतकी झाल्याचे सांगितले होते.

मे महिन्यापासून रेरा कायद्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर ग्राहकांचा विश्‍वास वाढू लागला असल्याचा दावा क्रेडाईचे अध्यक्ष जॅक्‍सी शहा यांनी केला. ते म्हणाले की, सुरुवातीला नोटाबंदी, रेरा आणि जीएसटीचा या क्षेत्रावर परिणाम झाला हाता. मात्र आता तो निवळला आहे. ते म्हणाले की, घराच्या निर्मिती आणि विक्रीतील मरगळ दूर करण्यासाठी तयार होत असलेल्या घरावरील जीएसटी 12 टक्‍क्‍यावरून कमी करण्याची गरज आहे.

त्यांनी सांगितले की, या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात मुंबईतील घराची विक्री 11 टक्‍क्‍यांनी, बंगळुरुतील विक्री 2 टक्‍क्‍यांनी, पुण्यातील विक्री 2 टक्‍क्‍यांनी, दिल्लीतील विक्री 26 टक्‍क्‍यांनी, कोलकात्यातील विक्री 280 टक्‍क्‍यांनी वाढली असल्याचे आढळून आले आहे.

नोटाबंदी, जीएसटी आणि रेरा कायद्याच्या अंमलबजावणीमुळे गेल्या तीन वर्षात रिऍल्टी क्षेत्रात निर्माण झालेली मरगळ आता संपुष्टात आली आहे. चालू वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात पुण्यासह भारतातील सात मोठ्या शहरातील घरांची विक्री 25 टक्‍क्‍यांनी वाढली आहे. दिल्ली आणि कोलकोतामधील विक्रीत जास्त वाढ झाली आहे. मात्र इतर शहरात विक्रीने वेग घेतलेला दिसत नाही.

रमेश नायर
मुख्य कार्यकारी अधिकारी, जेएलएल इंडिया

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)