हिंदू राष्ट्र निर्माण करणे हेच ध्येय : मनोज खाडे

म्हसवड  – देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपल्या देशातील हिंदुंची संख्या झपाट्याने कमी होवू लागली आहे. तुलनेने इतर धर्मीयांची संख्या वाढतेय.याला राजकिय मंडळी व कायदे जबाबदार असून कायदे फक्त हिंदुंसाठी तर त्याचे फायदे मात्र इतर धर्मीयांसाठी असा प्रकार आपल्या देशात सुरू आहे.

मतांच्या हव्यासापोटी राजकर्त्यांनी इतर धर्मीयांचे लांगुनचागन केल्यानेच आज हिंदुस्थानात हिंदुच असुरक्षित आहेत, परंतु, येणाऱ्या 2023 पर्यंत देशाला हिंदुराष्ट्र बनवायचे असल्याचा संकल्प हिंदू जनजागृति समितीने असल्याचे प्रतिपादन हिंदू जनजागृती समितीचे प्रचारक मनोज खाडे यांनी केले.

येथील म. फुले चौकात आयोजित हिंदू जनजागृती समितीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी हिंदू विधिज्ञ समितीचे सदस्य ऍड. संदीप अपशिंगे, नगराध्यक्ष तुषार विरकर, गटनेते धनाजी माने, नगरसेवक गणेश रसाळ, केशव कारंडे, नगरसेविका हिंदमालादेवी राजेमाने, पृथ्वीराज राजेमाने, सुरेश पुकळे, आप्पासाहेब पुकळे, सुरेश उबाळे, पद्माकर वाळुंजकर, आप्पा देसाई, धनाजी शिंदे, रामचंद्र नरळे आदी प्रमुख उपस्थित होते. ऍड. अपशिंगे यांचेही भाषण झाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)