‘बॉटल कॅप चॅलेंज’ची क्रेझ

सोशल मीडियावर कधी आणि काय ट्रेंडिंग होईल याचा काही नेम नाही. सतत बदलत असलेल्या या सोशल मीडियावर सध्या “बॉटल कॅप चॅलेंज’ भलतेच ट्रेंडिंग झाले असून सामान्य नेटकऱ्यांसोबतच सेलेब्रिटीजना देखील हे चॅलेंज स्वीकारून ते पूर्ण करण्याचा मोह आवाराता आला नाहीये. मुळात सोशल मीडियावर अशा प्रकारची चॅलेंजेस स्वीकारून ती पूर्ण करतानाच आपला व्हिडीओ अपलोड करण्याची प्रथा आता चांगलीच रूढ झाली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील गतवर्षी क्रिकेटर विराट कोहलीचे फिटनेस चॅलेंज स्वीकारून आपला योगा आणि एक्‍सरसाईज करतानाच व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला होता.

सध्या ट्रेंडिंग असलेल्या बॉटल कॅप चॅलेंजला देखील सेलेब्रिटीजकडून दांडगा प्रतीसाद मिळत असून हे चॅलेंजेस पूर्ण करणाऱ्यांमध्ये अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, विद्युत जामवाल, कुणाल खेमु, सिद्धार्थ जाधव, श्रेयस तळपदे अशा अनेक सेलेब्रिटीजचा समावेश आहे.

नेमकं काय आहे बॉटल कॅप चॅलेंज?
बॉटल कॅप चॅलेंजमध्ये चॅलेंज स्वीकारणाऱ्याला त्याच्यासमोर ठेवलेल्या बॉटलचे झाकण किक मारून उडवायचे असून असं करतानाच व्हिडीओ शेअर करायचा आहे. समोर ठेवलेल्या बॉटलचे झाकण सैल बसवले असल्याने ते किक मारताच खाली पडते मात्र एवढ्या उंचावर किक मारताना तुमच्या फिटनेसचा मात्र नक्कीच कस लागतो.

कसं सुरु झालं बॉटल कॅप चॅलेंज?
तायक्वोंदो फायटर आणि प्रशिक्षक फरबी डेवलेचेन यांनी सर्वप्रथम 25 जूनला अशा प्रकारचा व्हिडीओ टाकला. फरबी डेवलेचेन यांचा हा व्हिडीओ पाहून हॉलिवूड सुपरस्टार जेसन स्टॅथमने किक मारून बॉटलचे झाकण उडवतानाचा व्हिडीओ टाकला आणि येथून पुढे इंटरनेटवर या चॅलेंजला जबरदस्त प्रसिद्धी मिळाली.

मुळात बॉटल कॅप चॅलेंजची सुरुवात तायक्वोंदो फायटर आणि जगप्रसिद्ध ऍक्‍शन स्टारने केली असल्याने हे करताना तुमच्या फिटनेसचा कस लागणार एवढं मात्र नक्की. अशा या बॉटल कॅप चॅलेंजला स्वीकारून तुम्हीही आपली फ्लेक्‍सिबिलिटी आणि फिटनेस चेक करू शकता.

– प्रशांत शिंदे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)