कलमी पेरुची आवक सुरु 

पिंपरी- कलमी पेरूचा हंगाम सुरु झाला असून, आवक वाढली आहे.परिणामी पेरुची विक्री 60 ते 80 रूपये किलो दराने होत आहे. पपईची आवक घटल्याने त्याचा परिणाम झाला असून, पपईचे भाव वधारले आहेत. यंदा डाळींबाचे पीक चांगले आल्याने आवक वाढल्याने भाव घटले आहेत. मात्र, ग्राहकांकडून डाळींबांना मागणी वाढली आहे.

सिताफळाची आवक स्थिर असुन, भाव 50 ते 60 रूपये किलापदराने बाजारात उपलब्ध आहेत. परदेशातून आयात केलेल्या सफरचंदांने बाजी मारली असून त्याचे भाव 150 ते 180 रूपये किलोपर्यंत पोहचले आहेत. शिमला सफरचंद 120 रूपये किलो दराने विकले जात आहे. मोसंबीचा हंगाम संपल्याने इजिप्तवरुन मोसंबीची आवक सुरु झाली असून, 120 रूपये किलोदराने होत असल्याची माहिती फळ विक्रेता मेघराज बालकर यांनी दिली. तसेच आलु बुखारा, पिअर्स यांची मागणी होत असून त्याचे भाव 200 रूपये किलो आहेत. काही ठिकाणी अजूनही कलिंगड आणि खरबूज दिसून आले. परंतु, त्यांचा मोसम नसल्याने मागणी कमी असल्याचेफळ विक्रेता कुमार शिरसाठ यांनी सांगितले.

राज्याच्या सांगली, सातारा, बारामती, नाशिक, इंदापूर टेंभूर्णी आदी ठिकाणांवरून डाळींबाची आवक वाढली आहे. त्यामुळे 20 ते 50 रूपये किलादराने विक्री होत आहे. ते सर्व सामान्यांच्या आवाक्‍यात असल्याने नागरिकांची खरेदीसाठी गर्दी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)