#कव्हर स्टोरी: उद्योगरागिणीचा प्रेरणादायी प्रवास (भाग-२)

डॉ. जयदेवी पवार 
सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या आणि आपल्या मेहनतीने जगातील एका प्रचंड मोठ्या कंपनीच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचलेल्या इंद्रा नूयी या ऑक्‍टोबरमध्ये पेप्सिको कंपनीच्या सीईओपदावरून पायउतार होत आहेत. स्वप्नाचा सातत्याने पाठलाग करण्याची आईने लहानपणी दिलेली शिकवण त्यांनी तंतोतंत अंमलात आणली आणि अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून आपले लक्ष्य गाठले. अमेरिकेतही आपले भारतीयत्व जपणाऱ्या इंद्रा नूयी प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणास्रोत आहेत. 
पेप्सिको कंपनीला एक प्रतिष्ठाप्राप्त कंपनी बनविण्यात त्यांचा मोठा हातभार लागला. त्यांची मेहनत आणि आत्मप्रेरणा पाहून 2006 मध्ये पेप्सिकोचे चेअरमन आणि सीईओ रेनमुंड यांनी स्वतः निवृत्ती स्वीकारली आणि इंद्रा नूयी यांना चेअरमन बनविले. इंद्रा यांनी ही जबाबदारी मोठ्या हिकमतीने पेलली.
पेप्सिको अँड बेव्हरेज ही आज संपूर्ण जगाला व्यापून राहिलेली प्रचंड मोठी कंपनी आहे आणि अशा कंपनीचे सीईओपद भूषविणऱ्या इंद्रा नूयी या भारतीयांसाठी आदर्श ठरल्या आहेत. इंद्रा नूयी यांच्या यशस्वी कारकीर्दीचा विचार करून भारत सरकारने त्यांना 2007 मध्ये पद्मविभूषण देऊन सन्मानित केले. इंद्रा यांचे पती राजकुमार नूयी यांचा त्यांना भक्कम पाठिंबा लाभला आहे. अमेरिकेत इतकी वर्षे राहूनसुद्धा भारतीय संस्कृतीबद्दल इंद्रा यांना प्रचंड अभिमान आहे.
पेप्सिकोमधील इंद्रा यांची कारकीर्द खूप उशिरा सुरू झाली असली, तरी त्यावेळी त्यांना आईचे शब्द आठवले असतील. कोणत्याही लक्ष्याचा सातत्यपूर्ण पाठलाग केल्यास वयाच्या कोणत्या टप्प्यावर ते प्राप्त होईल, हे सांगता येत नाही, असे त्यांची आई सांगत असे. पेप्सिकोमधून जेव्हा त्यांना ऑफर आली, तेव्हा त्यांनी ही आनंदाची बातमी आईला सांगितली. तेव्हा आई म्हणाली होती, आनंदाची बातमी नंतर सांग. आधी दूध घेऊन ये. इंद्रा यांनी गॅरेजमध्ये पाहिले, तेव्हा त्यांच्या पतीची गाडी त्यांना दिसली. ते आठ वाजताच आले आहेत, हे समजल्यावर त्यांनी दूध का आणले नाही, असे इंद्रा यांनी विचारले. पती थकून आले होते, असे उत्तर मिळाले. नोकरांना दूध आणायला का पाठवले नाही,
असा प्रश्‍न करताच आईने आपण विसरून गेलो, असे उत्तर दिले होते. इंद्रा लगेच दूध आणण्यासाठी गेल्या. आल्यावर त्यांनी आईला खुशखबर सांगितली. तेव्हा आई म्हणाली होती, की कंपनीत तू कोणत्याही पदावर काम करत असली, तरी घरात आल्यावर तू एक पत्नी बनतेस, आई बनतेस. कंपनीतले तुझे पद कोणीही सांभाळू शकते. परंतु घरातले तुझे पद कुणीही सांभाळू शकत नाही.
या टिपिकल संवादातून अनेक भारतीय मुलींना स्वतःची छबी निश्‍चित दिसेल. घराघरात हीच परिस्थिती असते. घराबाहेर मुलींनी कितीही नाव कमावले, तरी घरातील कामकाजापुढे ते ठेंगणे करण्याची आपल्याकडे सर्वांना सवयच आहे. मोठे यशही घरात आल्यावर खुजे होऊन जाते. परंतु इंद्रा नूयी यांनी याही बाबीचा फारसा गांभीर्याने विचार न करता, खचून न जाता सातत्याने दमदार वाटचाल सुरूच ठेवली. त्या व्यापार जगतात.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)