व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे उपस्थित राहण्याचा लालूंना कोर्टाचा आदेश

नवी दिल्ली  – आयआरसीटीसी घोटाळ्याच्या संबंधात राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी 20 डिसेंबर रोजी व्हिडीओ कॉन्फरसिंग द्वारे कोर्टाच्या सुनावणीसाठी हजर राहावे असा आदेश दिल्लीच्या कोर्टाने दिला आहे. आज या विषयी विशेष न्यायाधिश अरूण भारद्वाज यांच्या कोर्टात झालेल्या सुनावणीच्यावेळी लालूंच्या वकिलांनी सांगितले की त्यांची
प्रकृती बरी नाहीं त्यामुळे ते सुनावणीला हजर राहु शकत नाहीत. त्यावर कोर्टाने त्यांना हे आदेश दिले.

लालूप्रसाद हे कारागृहात असल्याने तेथून ते व्हिडीओ कॉन्फरसिंग द्वारे या सुनावणीला हजर राहू शकतात असा अभिप्राय कोर्टाने दिला. आयआरसीटीसीची दोन हॉटेल्स खासगी कंत्राटदारांना चालवण्यासाठी देण्याच्या प्रकरणात कोट्यवधी रूपयांची लाच लालूप्रसाद यादव यांनी घेतल्याचा त्यांच्यावर आरोप असून सीबीआयने या प्रकरणाचा तपास करून त्याची माहिती कोर्टात सादर केली आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)