तुरूंग अधीक्षक यु.टी.पवारांना न्यायालयात हजर राहुन बाजू मांडण्याचे आदेश

कुख्यात गजा मारणे याला सातारा काराग़ृहात पाठविण्याच्या आदेशाचे पालन न केल्याने आदेश

पुणे – कुख्यात गजा मारणे याला सातारा येथील कारागृहात पाठविण्यासंदर्भात न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी न्यायालयाने तुरुंग अधीक्षक यु.टी. पवार यांना बाजू मांडण्याचे न्यायालयाने दिले आहेत. 23 मार्च रोजी सकाळी 11 वाजता न्यायालयात हजर राहुन आपले म्हणणे मांडावे, असे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जे.एस.केळकर यांनी आदेशात म्हटले आहे.

कारागृह प्रशासनाकडून न्यायालयात हजर करण्यासाठी पैसे आणि भेटवस्तूंची मागणी केली जाते. अशी तक्रार गजा मारणे यांनी न्यायालयाकडे नुकतीच केली होती. त्या संदर्भात न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कार्यवाही झाली नाही, अशी तक्रार मारणेच्या वतीने करण्यात आली होती. त्यानुसार ऍड. विजय ठोंबरे यांनी न्यायालयाकडे अर्ज दाखल केला. यावर सुनावणी करत न्यायालयाने आज सुनावणी केली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)