कौंटी क्रिकेटमुळे निश्‍चितच फायदा झाला – अश्‍विन

गोलंदाजीची शैलीही बदलली 
बर्मिंगहॅम: इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिला दिवस गाजवला तो भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने. इंग्लंडच्या चार फलंदाजांना बाद करत अश्विनने भारताला पहिल्याच दिवशी वर्चस्व मिळवून दिले. आपल्याला हे यश का मिळाले, याचे विश्‍लेषण अश्विनने केले असून कौंटी क्रिकेट खेळल्यामुळे मला फायदा झाला अशी कबुली त्याने दिली आहे. तसेच गोलंदाजीची शैलीही पूर्वीच्या तुलनेत खूपच साधी ठेवल्यामुळेही फलंदाजांना पेचात पकडणे शक्‍य झाल्याचे अश्‍विनने म्हटले आहे.
इंग्लंडने पहिल्या डावांत चांगली सुरुवात केली होती. परंतु अश्विनच्या फिरकीच्या बळावर पहिल्या दिवसअखेर भारताने इंग्लंडला 9 बाद 285 धावांत रोखण्यात यश मिळवले. सामन्यात सातव्या षटकांत गोलंदाजीला आलेल्या अश्‍विनने आपल्या दुसऱ्याच षटकांत सलामीवीर ऍलिस्टर कूकचा अडथळा दूर करत भारताला पहिले यश मिळवून दिले. अश्विनने यावेळी आपल्या गोलंदाजीमध्ये विविधता ठेवली होती. त्याने आपल्या चेंडूचा वेग, टप्पा आणि दिशा यामध्ये चांगले बदल केले. त्यामुळे इंग्लंडचे फलंदाज त्याची गोलंदाजी खेळताना अडखळत होते. या गोष्टीचा फायदा अश्विनने उचलला आणि त्याला चार बळी मिळू शकले.
आपल्या यशाचे श्रेय अश्‍विनने येथील कौंटी क्रिकेटला दिले आहे. मागच्या वर्षी मी येथे कौंटी क्रिकेट खेळावयास आलो, तेव्हा येथील फिरकी गोलंदाजांच्या शैलीतील फरक लक्षात घेतला. त्यातही इंग्लंडमधील फिरकी गोलंदाज कोणत्या वेगाने चेंडू टाकतात याचा अभ्यास केल्याचा मला फायदा झाला असे सांगून अश्‍विन म्हणाला की, या मैदानावर गोलंदाजी करताना मला एका क्षणात लक्षात आले की, ही खेळपट्टी पहिल्याच दिवशी धीमी झाली असून चेंडूच्या गतीत फरक पडत आहे. त्यामुळे चेंडू धीम्या गतीने टाकला तर फलंदाजाला तो चेंडू फ्रंटफूट किंवा बॅकफूट वर जाऊन खेळावयास भरपूर वेळ मिळत आहे.
परिणामी चेंडूच्या गतीत सातत्याने बदल करण्याचे धोरण मी अवलंबले.
आपल्या गोलंदाजीच्या शैलीत बदल करण्यास प्राधान्य देत असल्याचेही सांगून अश्विन म्हणाला की, मागील एक ते दीड वर्षांपासून मी स्थानिक स्पर्धा खेळण्यावर भर देत आहे. त्यामुळे मला गोलंदाजीच्या शैलीत आवश्‍यक बदल करता येऊ लागले आहेत. त्याचबरोबर मी खेळपट्टी कोणत्या प्रकारची आहे याचा विचार न करता समोरच्या फलंदाजाला बाद करण्यासाठीा कोणत्या प्रकारचा चेंडू टाकावा लागेल यावरच लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत आहे.
आजकाल खेळपट्टी शक्‍यतो फलंदाजांना साहाय्य करणारी असते. त्यामुळे सध्या खेळपट्टीचा वापर करुन चेंडू टाकण्यापेक्षा हवेतच चेंडू वळवण्यावर माझा भर असतो. जेणेकरून फलंदाजांना चकवताही येईल आणि बळीही मिळवता येतील. त्या दृष्टीने गोलंदाजी केल्याचाही मला फायदा झाला, असे अश्‍विनने यावेळी सांगितले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)