रोड सेफ्टीबाबत विद्यार्थ्यांचे समुपदेशन करा

पुणे विभागीय तंत्रशिक्षण विभागाने दिले शैक्षणिक संस्थांना निर्देश

पुणे – शहर वाहतूक विभागामार्फत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी रस्ता सुरक्षा, वाहतुकीचे मूलभूत नियम, सामाजिक जबाबदारी, या वाहतूक संदर्भात समुपदेशन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी महाविद्यालयात वाहतूक विभागाशी समन्वय साधून समुपदेशन कार्यक्रमासाठी पुढाकार घेण्याचे निर्देश पुणे विभागीय तंत्रशिक्षण विभागाने सर्व शैक्षणिक संस्थांना दिले आहेत.

पुण्यात वाहनांचे प्रमाण हे नागरिकांच्या संख्यपेक्षा दीड पटीने वाढलेले आहे. वाहनचालकांची वाहन चालविण्याची अयोग्य सवय, निष्काळजीपणा व इतर अन्य बाबीमुळे अपघातांचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे अपघाती मृत्यू संख्येतही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यासाठी रस्त्यावरील सुरक्षा तसेच मोटार वाहन चालविताना घेण्याची काळजी, याबाबत पुणे पोलिसांची वाहतूक शाखेमार्फत विविध स्तरावर नागरिकांसाठी जागरूकता अभियान सुरू करण्यात आलेले आहे. हेच अभियान महाविद्यालयाने राबवावा, असे तंत्रशिक्षण विभागाने केलेले आहे.

सर्व शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांना सभोतालच्या परिस्थितीबाबतची जागरूकता निर्माण करून दिल्यास ते याबाबत चांगला प्रतिसाद देऊ शकतील. एक जबाबदार नागरिक बनविण्यास सहाय्य करतात. तसेच आपल्या पालकांना व सहकारी मित्रांना रस्ता सुरक्षेचे महत्त्व पटवून देऊ शकतील. यासाठी वाहतूक विभागामार्फत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मूलभूत नियमांची माहिती व्हावी व रस्ता सुरक्षाबाबत त्यांच्या मनात सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण व्हावी यासाठी समुपदशेन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या अंतर्गत पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या समवेत सायकियाट्रिस्ट, सायकॉलॉजिस्ट, रस्ता सुरक्षाबाबत तज्ज्ञ, व्यावसायिक मंडळीचा कक्ष तयार करण्यात आलेला आहे.

समन्वय अधिकाऱ्याची नेमणूक
या कार्यक्रमांतर्गत आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन कार्यक्रम आयोजित करावेत. हा कार्यक्रम संपूर्ण वर्षभर सुरू राहणार आहे. या कार्यक्रमांतर्गत पुणे शहर वाहतूक विभागामार्फत पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांची आयोजन व समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे विभागाच्या तंत्रशिक्षण विभागाकडून देण्यात आली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)