कॉसमॉसच्या मेळाव्यास ठेवीदारांचा प्रतिसाद

पुणे – कॉसमॉस बॅंकेने नुकतेच आपल्या ठेवीदार आणि ग्राहकांकरिता विभागवार मेळावे आयोजित केले होते. 17 ते 19 डिसेंबर या कालावधीत या मेळाव्यास ठेवीदारांची उपस्थिती लक्षणीय होती.

बॅंकेचे अध्यक्ष, सीए मिलिंद काळे म्हणाले की, ठेवीदारांचा संवाद हा फक्‍त संबंधित शाखेमधील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी होत असतो. ठेवीदारांकरिता म्हणून अशा प्रकारचे मेळावे आयोजित करण्यात आले ज्यामुळे ठेवीदारांच्या सूचना, शंका, अडचणी याबाबत चर्चा करता आली. डिजिटल बॅंकिंग, पासबुक प्रिंटिंग किऑक्‍स्‌, सर्व्हिस चार्जेस, ट्रेनिंग, सायबर सिक्‍युरिटी आदी विषयांवर चर्चा झाली.

सायबर हल्ल्याच्यावेळी ठेवीदारांनी काढलेल्या ठेवी थोड्याच काळात पुन्हा आणून ठेवल्या आहेत यातून बॅंकेवर ठेवीदारांचा असलेला दृढ विश्‍वास लक्षात येतो. कॉसमॉस बॅंकेने सध्याची कोअर बॅंकिंग प्रणाली अधिक सुरक्षित आणि संरक्षित करण्याकरिता रु. 4-50 कोटींचा खर्च केला आहे. ठेवीदार हेच आमचे ब्रॅंड ऍम्बेसिडर आहेत.

समूह अध्यक्ष, डॉ. मुकुंद अभ्यंकर म्हणाले की, आगामी काळात ज्येष्ठ नागरिकांकरिता टॅब बॅंकिंग ही घरपोच सेवा सुरू करणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना घरबसल्या बॅंकिंग सेवा मिळू शकणार आहे.
बॅं

केचे उपाध्यक्ष, गोविंद क्षीरसागर यांनी सांगितले की, अशाच प्रकारचे ठेवीदारांचे मेळावे बॅंकेने औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर येथेही आयोजित केले होते. व्यवस्थापकीय संचालक, सुहास गोखले म्हणाले की, हा एक कौटुंबिक प्रकारचा कार्यक्रम असून आपल्या सूचना ऐकण्यासाठी आणि आपल्याशी हितगुज करण्यासाठी आम्ही आलो आहोत.

संचालक राजीव साबडे यांनी सांगितले की, पुण्यात जशी कट्टा संस्कृती लोकप्रिय आहे तशाच धर्तीवर आपल्याशी संवाद साधण्याकरिता बॅंकचे फेसबुक पेज उपलब्ध असून, सोशल मीडियामार्फत आपण सर्वांनी बॅंकेशी अवश्‍य संवाद साधण्याची विनंती त्यांनी यावेळी केली. मेळाव्यास बॅंकेच्या संचालिका डॉ. स्मिता जोग, ज्येष्ठ संचालक, प्रल्हाद कोकरे आणि वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)