रेशनिंग मध्ये गैरव्यवहार

केजरीवालांनी दिले थेट आयुक्तांच्याच निलंबनाचे आदेश

नवी दिल्ली: दिल्लीच्या बऱ्याच भागात रेशनिंग व्यवस्थेचे धान्य पोहचत नसल्याच्या तक्रारी आल्यानंतर आणि त्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे आढळून आल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अन्न आणि नागरी पुरवठा खात्याच्या आयुक्तालाच निलंबीत केले आहे. नुकतेच मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिल्याची माहिती अन्न पुरवठा मंत्री इम्रान हुसेन यांनी दिली. त्यांनी सांगितले की काल रात्री आम्ही नगलोई भागातील रेशन दुकानात गेलो त्यावेळी तेथील गहु आणि तांदळाचा साठाच बेपत्ता असल्याचे आढळून आले.

-Ads-

वास्तविक त्या दुकानदाराने रेशनवर विकण्यासाठीचे धान्य घेतल्याच्या पावत्या सरकारकडे जमा आहेत. त्यानुसार तेथे 152 क्विंटल गहु आणि 38 क्विंटल तांदुळ असणे अपेक्षित होते. डिसेंबर महिन्याच्या वितरणासाठी त्या दुकानदाराला ते धान्य पुरवण्यात आले होते. याची माहिती आम्ही मुख्यमंत्र्यांना दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी थेट अन्नधान्य वितरण आयुक्तांनाच तडकाफडकी निलंबीत करण्याचा आदेश दिला आहे. त्यांचा हा आदेश दिल्लीच्या नायब राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे असे मंत्र्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)