एअर इंडियाचे माजी अध्यक्ष अरविंद जाधव यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा

नवी दिल्ली : एअर इंडियाचे माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अरविंद जाधव आणि अन्य माजी अधिकाऱ्यांच्या विरोधात सीबीआयने आज भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. डॉ एल.पी. नखवा, ए कथपलिया, अमिताभ सिंग आणि रोहित भसीन अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या अन्य माजी अधिकाऱ्यांची नावे आहेत हे सर्व अधिकारी महाव्यवस्थापक किंवा अतिरीक्त महाव्यवस्थापक दर्जाचे अधिकारी आहेत.

जाधव यांच्यावर काही अधिकाऱ्यांना पात्रता नसताना बढती दिल्याचा आरोप आहे. त्यासाठी त्यांनी एअर इंडिया मध्ये जी बढती समिती नेमली होती तीच बोगस होती असे सीबीआयचे म्हणणे आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या समितीने कथपलिया यांच्या सह पाच जणांना बढती देण्याची शिफारस केली होती. कथपलिया यांच्या विरोधात गुन्हा दाखल असतानाही त्यांना महाव्यवस्थापक दर्जा देण्यात आला होता. सिंग आणि बसीन यांच्या नियुक्‍त्यांच्या बाबतीतही सीबीआयचा हा आरोप आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)