बिअरबार मालकाच्या उमेदवारीने प्रदीप अण्णांच्या सत्तेला सुरुंग

-बारवाला सरपंच नको गं बाई
-खटाव ग्रामपंचायत निवडणूक विश्‍लेषण
-प्रकाश राजेघाटगे

बुध – कोरेगाव विधानसभा मतदार संघातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या खटाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपाचे नेते महेश शिंदे व राहुल पाटील यांच्या परिवर्तन पॅनेलने सरपंचपदासह चौदा जागा जिंकून कमळ फुलविले आहे. तथापि, बिअर बार मालकाच्या उमेदवारीमुळेच प्रदीप आण्णांच्या वीस वर्षाच्या सत्तेला सुरुंग लागल्याचे बोलले जात आहे. खटावचा हा निकाल आ. शशिकांत शिंदेना धोक्‍याची घंटा असल्याची चर्चा मतदार संघात व्यक्त होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

खटाव ग्रामपंचायतीतील राष्ट्रवादीच्या सत्तेला सुरूंग लावण्यासाठी आ. शिंदे यांचे संभाव्य प्रतिस्पर्धी महेश शिंदे यांनी राहुल पाटील यांच्याशी आघाडी केली होती. शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आ. शशिकांत शिंदे यांच्या 20 वर्षाच्या सत्तेला सुरूंग लावला आहे. 18 पैकी भाजपचे 14 उमेदवार निवडून आले आहेत. तर सत्ताधारी राष्ट्रवादीला केवळ 4 जागांवर समाधान मानावे लागले आहे. खटाव ग्रामंचायतीमध्ये सत्तांतर झाल्यामुळे कोरेगाव मतदार संघातील भाजप कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष साजरा केला. सरपंचपदाची निवडणुक थेट जनतेतून झाली. यामध्येही भाजपचे नंदू वायदंडे यांनी राष्ट्रवादीचे विजय बोबडे यांचा दारूण पराभव केला.

दरम्यान राजकीयदृष्ट्‌या महत्वपूर्ण समजल्या जाणारी खटाव ग्रामपंचायच्या 18 जागांसाठी एकूण 7968 मतदारांपैकी 6636 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. महिनाभर प्रचाराचा धुराळाच उडाला होती. राष्ट्रवादीने सत्ता राखण्यासाठी आ. शशिकांत शिंदे यांनी सभा घेवून लोकांच्यात विश्‍वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता तर भाजपचे महेश शिंदे यांनी खटाव ग्रामपंचायतीची सत्ता एकदा भाजपला द्या, कायापालट करून दाखवतो, अशी साद खटावकरांना घातली. राष्ट्रवादीच्या प्रचाराची धुरा प्रदिप विधाते यांनी सांभाळली होती. कोरेगाव मतदार संघातील खटाव ग्रामपंचायतीची सत्ता ही महत्वपूर्ण मानली जाते.

गेले 20 वर्षे सत्ता राष्ट्रवादीचे प्रदीप अण्णांच्या ताब्यात होती. यावेळी मात्र लोकांनी त्यांना नाकारले. मोठी मतदारसंख्या असलेली खटावची सत्ता राष्ट्रवादीच्या हातून गेल्यामुळे आ. शशिकांत शिंदे यांना विधानसभेची निवडणुक म्हणावी तितकी सोपी राहिलेली नाही. कोरेगाव शहरातील नगरपंचायतही आ. शिंदे यांच्या विरोधात आहे. कोरेगावबरोबर सातारा तालुक्‍यातील काही गावांमध्येही आ. शशिकांत शिंदे यांच्या विरोधी मोठी लाट निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत धोक्‍याची घंटा आहे, असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

गेल्या 10 ते12 वर्षापूर्वी महिलांनी दारूबंदीसाठी लढा उभा केला होता. त्यावेळी बाटली आडवी करण्यासाठी मतदान झाले. पण दुदैवाने बाटली उभीच राहिली. राष्ट्रवादीचे सरपंच पदाचे उमेदवार विजय बोबडे यांचा बिअरबार असल्याने त्यावेळच्या पराभवाचा वचपा बारवाला सरपंच नको गं बाई असा प्रचाराने पराभव करून काढला.

भाजपाच्या महेश शिंदेसाठी आगामी विधानसभेची रंगीत तालीमच या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत होती. त्यांच्यासमवेत माजी आमदार चंद्रहारदादा यांचे नातू राहुल पाटील यांच्या राम-लक्ष्मणाच्या जोडीने पाणी, योग्य घरफळा’ जिहे-कठापूर अशा जिव्हाळ्याचे प्रश्‍न हातात घेऊन ग्रामपंचायतीची सत्ता ताब्यात घेतली. यानिमित्ताने महेश शिंदेंना आमदार करण्यासाठी कंबर कसली आहे. निवडणुकीत तीन आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समितीसह जिल्हा बॅंकेची सर्व राजकीय ताकद लावून सुद्धा परिवर्तन पॅनेलला रोखण्यात राष्ट्रवादीला यश आले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)