नगरसेवक म्हणतात, ‘ह्योच अधिकारी हवा’

अधिकाऱ्यांसाठी नगरसेवकांची शिफारस; सेवा गोपनीय अहवाल मिळालाच कसा?

पुणे – महापालिकेतील शिपाईवर्ग किंवा अन्य कर्मचाऱ्यांना अमुक-अमुक खात्यात घ्यावे, बदली करावी किंवा रद्द करावी, अशा शिफारशी कायमच नगरसेवक करत असतात. परंतु, राज्य सरकारकडून प्रतिनियुक्तीवर महापालिकेत आलेल्या अधिकाऱ्याला महापालिका सेवेत सामावून घेण्याची शिफारस नगरसेवकाने केली आहे. हा सेवा गोपनीय अहवाल नगरसेवकांना कसा काय मिळाला, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सुशील मेंगडे असे शिफारस केलेल्या नगरसेवकाचे नाव असून अधिकाऱ्याचे नाव रवींद्र शेडगे असे आहे. शेडगे यांचा सेवा गोपनीय अहवाल चांगला असल्यामुळे त्यांना राज्य सरकारच्या सेवेतून महापालिका सेवेत कायमस्वरूपी वर्ग करण्याचा प्रस्ताव विधी समितीला दिला होता. विशेष म्हणजे तो प्रस्ताव विधी समितीमध्ये मंजूर होऊन मुख्यसभेतही मंजूर झाला आहे. सद्यस्थितीत हा प्रस्ताव राज्यसरकारकडे मंजुरीसाठी गेला आहे.

शेडगे हे राज्यसरकारच्या वित्त विभागाकडील वर्ग दोनचे अधिकारी आहेत. महापालिकेच्या सेवेत ते सध्या प्रशासनाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. गेल्या चार वर्षांत त्यांनी महापालिकेत चांगले काम केले आहे तसेच महापालिकेच्या स्मार्ट सिटी स्पर्धेतही त्यांनी चांगले काम केल्याचे, मेंगडे यांनी केलेल्या शिफारशीत म्हटले आहे.

एखाद्या अधिकाऱ्याला सेवा गोपनीय अहवालावरुन बढती देण्यात येते. हा निर्णय देखील आयुक्त किंवा ज्यांना अधिकार आहे त्या दर्जाचा अधिकारी बढतीचा निर्णय घेतात. तसेच ते वरिष्ठच गोपनीय अहवालही लिहितात. असे असताना एखाद्या नगरसेवकाकडे राज्यसरकारकडील गोपनीय अहवालातील तपशील कसे काय, असा प्रश्‍न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)