‘नोटा’मुळे रंगू शकतो फेरनिवडणुकीचा फड!

निवडणूक आयोगाचा आदेश : नगर, धुळे महापालिका आणि श्रीगोंद्याच्या नगरपालिकेत पहिली अंमलबजावणी

पाच लाखांची खर्च मर्यादा

अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवाराला पाच लाखांची खर्च मर्यादा असणार आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर यांनी यावेळी दिली. या खर्चाचा तपशील देखील उमेदवारांना वेळोवेळी सादर करावा लागणार आहे. खर्चाचा तपशीलाचा अर्ज दररोज संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात द्यावा लागणार आहे.

नगर  – राज्य निवडणूक आयोगाने मतदानात जास्त ‘नोटा’ झाल्यास फेरनिवडणूक घेण्याचा आदेश आहे. या आदेशाची अंमलबजावणी अहमदनगर व धुळे महापालिका आणि श्रीगोंद्यातील नगरपालिकेच्या निवडणुकीत होणार आहे. राज्यात या आदेशाची अंमलबजावणी करणारे अहमदनगर, धुळे महापालिका आणि श्रीगोंदे नगरपालिका पहिली होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर आणि उपायुक्त सुनील पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन दिली.

राज्य निवडणूक आयोगाने 6 नोव्हेंबरला “नोटा’ संदर्भात आदेश काढला आहे. निवडणुकीत कोणत्याही प्रभागात अथवा वॉर्डमध्ये सर्वाधिक मते “नोटा’ला पडल्यास सदर निवडणूक प्रक्रिया रद्द ठरविण्यात येणार आहे. दुसऱ्यांदा निवडणूक घेऊन सुद्धा “नोटा’ला सर्वाधिक मते पडल्यास दुसऱ्या क्रमांकाचा उमेदवार विजयी जाहीर करण्यात येणार आहे. या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी अहमदनगर महापालिका निवडणुकीत होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.

आजारपणाची सुट्टी नाही

निवडणुकीच्या कामकाजासाठी सुमारे 2 हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्‍त्या होताच, कामातून पळवाट काढण्यासाठी बऱ्याच कर्मचाऱ्यांनी आजारपणाचे अर्ज सादर करत आहेत. गंभीर आजारांचा विचार होईल. खोटा अर्ज करणाऱ्यांवर आयोगाच्या आदेशाप्रमाणे कारवाई होईल, असे उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर यांनी सांगितले.

नगर जिल्ह्याती श्रीगोंदे नगरपालिकेची देखील निवडणूक होऊ घातलेली आहे. या आदेशाची अंमलबजावणी देखील तिथे होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या आदेशाची अंमलबजावणी करणारे अहमदनगर व धुळे महापालिका आणि श्रीगोंदे नगरपालिका पहिले ठरणार आहे. नोटाच्या मतदानाचा अधिकारी हा मतदारांचा आहे. त्यामुळे मतदारांनी त्याचा उपयोग कसा करायचा, त्यांनी ठरवावे. प्रशासन राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास कटिबद्ध असल्याचेही द्विवेदी यांनी स्पष्ट केले.

जात पडताळणीची अंमलबजावणी

उमेदवारांना जात पडताळणी प्रमाणपत्र अनिवार्य आहे. हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे. प्रशासनाने पडताळणीच्या प्रस्तावासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. अतिरीक्त आयुक्त विलास वालगुडे यांची त्यासाठी नियुक्ती आहे. प्रस्ताव समितीकडे सादर करण्याची जबाबदारी वालगुडे हे करणार आहेत.

हत्यारबंद पोलिसांचा बंदोबस्त

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आचारसंहितेची कडक अंमलबजावणीच्या सूचना आहेत. अधिकारी आयोगाच्या मार्गदर्शनानुसार काम करत आहेत. त्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन अधिकाऱ्यांना हत्यारबंद पोलिसांचा बंदोबस्त देण्यात आला आहे. पोलिसांना संरक्षणासाठी संपूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. सहाही प्रभागाच्या अधिकाऱ्यांना हा बंदोबस्त आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)