कोपा अमेरिकन फुटबॉल स्पर्धा : ब्राझील व चिली उपांत्य फेरीत

पोतोअल्जिरा – पाच वेळा विश्‍वचषक जिंकणाऱ्या ब्राझीलने पेराग्वे संघाचा पेनल्टी शूटआऊटद्वारा 4-3 असा पराभव केला आणि कोपा अमेरिकन फुटबॉल स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली. चिली संघासही उपांत्य फेरीत स्थान मिळविताना कोलंबियाविरुद्ध झगडावे लागले. त्यांनी हा सामना पेनल्टी शूटआऊटद्वारा 5-4 असा जिंकला.

ब्राझील व पेराग्वे हा सामना रंगतदार झाला. मात्र, दोन्ही संघांनी जोरदार चाली करूनही त्यांना पूर्ण वेळेत गोल नोंदविता आला नाही. त्यामुळे पेनल्टी शूटआऊटचा उपयोग करण्यात आला. त्यामध्ये ब्राझील संघाकडून व्हिलीयन, मार्क्विन्होस, कुटिन्हो व गॅब्रिअल जेसूस यांनी गोल केले. पेराग्वे संघाच्या मिग्वेन अल्मीरोन, ब्रुनो वाल्डेझ व रॉड्रिगो रोजास यांनी गोल नोंदविले. चिली व कोलंबिया हा सामनाही चुरशीने खेळला गेला.

पूर्ण वेळेत गोलफलक कोराच राहिल्यानंतर पेनल्टीचा उपयोग करण्यात आला. त्यावेळी चिली संघाकडून अर्तुरो विडाल, एडवर्ड व्हेर्गास, एरिक पुल्गार, ऍर्नाग्विझ व ऍलेक्‍सी सॅंचेझ यांनी गोल केले. कोलंबियाकडून जेम्स रॉड्रिग्ज, एडविन कार्डोना, जुआन क्वाड्रादो व मेरीओस मिन्हास यांनी गोल केले. मात्र, त्यांच्या विल्यम तेसिलो याने गोल करण्याची संधी वाया घालविली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here