कोल्हापूर, हातकणंगलेसाठी प्रचार समन्वय नियुक्त

कोल्हापूर: कॉंग्रेस व राष्ट्रवादीची राज्यात आघाडी झाली असल्याने पक्षनेते व कार्यकर्त्यांनी आघाडी धर्म पाळून आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारात उतरावे, अशा आशयाचे पत्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांना पाठविले आहे. या पत्राबरोबरच प्रचार समन्वयकांच्या नियुक्तीचे पत्र पाठविण्यात आले आहे.

कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघांसाठी आमदार संग्राम थोपटे यांची प्रचार समन्वयक म्हणून नियुक्ती झाली आहे. हे पत्र हातात पडल्यानंतर जिल्ह्यात कॉंग्रेस सक्रिय झाली असून, समन्वयकांच्या नेतृत्वाखाली येत्या सोमवारी (दि. 25) आघाडीची एकत्रित बैठक घेतली जाणार आहे, असे कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी सांगितले.

आवाडे हे कॉंग्रेस कमिटीत आले होते. प्रसारमाध्यमांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता, आवाडे यांनी प्रदेशाध्यक्षांच्या सूचना व समन्वयक याची माहिती दिली. त्याप्रमाणे पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या जात असल्याचेही आवाडे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)