सहकार खात्यातील कामकाज “ऑफलाइन’

ऑनलाइन अर्ज प्रणाली सुरू करण्याकडे दुर्लक्ष

पुणे – सहकार खात्यातील मानवी अभिहस्तांतरणाची (डिम कनव्हेस) प्रकरणे स्वीकारणारी ऑनलाइन प्रक्रिया बंद पडली असल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या 4 महिन्यांपासून ही प्रक्रिया बंद पडली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सध्या शहरात इमारतींच्या पुनर्निर्माणाची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. या पुनर्निर्माणासाठी सोसायटीचे डिम कनव्हेन्स होणे आवश्‍यक असते. त्यामुळे सहकार खात्यामध्ये हे डिम कनव्हेन्स करून घेण्यासाठी सध्या सोसायटीच्या संचालकांची गर्दी होत आहे. हे डिम कनव्हेन्स करून घेण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया करावी लागत आहे. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट आऊट काढून सहकार खात्याकडे सादर करावे लागते.

गेल्या 4 महिन्यांपासून मात्र, ही ऑनलाइन प्रक्रियाच बंद आहे. त्याचा त्रास मात्र नागरिकांना सोसावा लागत आहे. त्यामुळे डिम कनव्हेंसची सर्व कामे खोळंबली आहेत. ऑनलाइन प्रक्रिया त्वरित सुरू करावी, अशी मागणीसुद्धा होत आहे. पण, त्याकडे खात्याचे लक्ष दिसत नाही. ऑनलाइन प्रक्रिया बंद असेल तर ऑफलाइन अर्ज स्वीकारले पाहिजेत, असे न्यायालयाचे आदेश आहेत, पण ऑफलाइन अर्ज स्वीकारले जात नाहीत. प्रथम ऑनलाइन अर्ज भरा, असे सांगितले जाते. हे अत्यंत चुकीचे आहे.

5 मार्चपासून आंदोलन…

यासंदर्भात युवराज पवार यांनी मुख्यमंत्र्यांसह सहकार खात्याच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना ई-मेल पाठविले आहेत. पण त्याची दखल अद्याप घेतली गेलेली नाही. त्यामुळे आता आंदोलन करण्याशिवाय पर्याय नसल्याने पवार यांनी 5 मार्चपासून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)