इंडियन मिलटरी अकॅडमीत 427 छात्रांचे दीक्षांत संचलन

डेहराडून: येथील इंडियन मिलिटरी अकॅडमीत यशस्वीरित्या अभ्यासक्रम पुर्ण करणाऱ्या 427 छात्रांचे आज दीक्षांत संचलन झाले. भारतीय लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल देवराज अंबु यांनी या छात्रांची मानवंदना स्वीकारली. त्यांनी प्रशिक्षण यशस्वीरित्या पुर्ण करणाऱ्या छात्रांचे अभिनंदन केले. आपण स्वता याच संस्थेतून लष्करात दाखल झालो आहोत त्यामुळे याच संस्थेंच्या छात्रांच्या दीक्षांत संचलनात उपस्थित राहण्यास आपल्याला विशेष आनंद होत असल्याची भावना लेफ्टनंट जनरल अंबु यांनी व्यक्त केली.

आज उत्तीर्ण झालेल्या एकूण छात्रांमध्ये विदेशातील 80 छात्रांचाही समावेश आहे. भारतातर्फे आपल्या मित्र देशातील छात्रांना भारतातील काही महत्वाच्या लष्करी केंद्रांमध्ये प्रशिक्षणासाठी अनुमती देत असते. या छात्रांमध्ये अफगाणिस्तान, भुतान, मालदीव, नेपाळ, श्रीलंका, तझाकिस्तान आणि व्हीएतनाम या देशांतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दीक्षांत संचलनाच्या मुख्य कार्यक्रमानंतर छात्र आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी एकत्र एक पिपींग सेरिमनीही येथे प्रथेनुसार आयोजित केला गेला.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)