‘खून करून या, त्यानंतरचं मी पाहतो’ : पूर्वांचल विद्यापीठाच्या कुलगुरूंचे वादग्रस्त वक्‍तव्य

गाझीपूर: पूर्वांचल विद्यापीठाचे कुलगुरू राजाराम यादव यांनी वादग्रस्त वक्‍तव्यामुळे ते चर्चेत आले आहेत. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतानाचा त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात ते विद्यार्थ्यांना सल्ला देत आहेत. जर आपल्या विद्यापीठातील विद्यार्थ्याने कधी, कोणाबरोबर भांडण केले तर त्याने मार न खाता मारून आले पाहिजे. इतकंच नव्हे तर जर तुम्हाला शक्‍य असेल तर त्याचा खूनही करून या. नंतरचं आम्ही पाहू, असा अजब सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना जाहीर कार्यक्रमात दिला.

पूर्वांचल विद्यापीठाचे कुलगुरू राजाराम यादव हे गाझीपूर येथील एका परिषदेदरम्यान विद्यार्थी आणि शिक्षकांना मार्गदर्शन करत होते. “उच्च शिक्षणासमोरील आव्हाने’ या विषयावर आयोजित परिषदेत त्यांनी हे वक्‍तव्य केले. ते म्हणाले, युवा विद्यार्थी तोच असतो जो दगडावर पाय मारून पाण्याची धार त्यातून काढू शकतो. तो आपल्या जीवनात जो संकल्प निश्‍चित करतो. तो संकल्प पूर्णत्वास नेतो. अशा विद्यार्थ्यालाच पूर्वांचल विद्यापीठाचा विद्यार्थी म्हणतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यानंतर ते म्हणाले, जर तुम्ही पूर्वांचल विद्यापीठाचे विद्यार्थी असाल तर माझ्याकडे कधीही रडत येऊ नका. एक गोष्ट सांगतो, जर एखाद्याशी भांडण झालं तर त्याला मारहाण करून यायचं. तुमची इच्छा झाली तर त्याचा खून करून या, त्यानंतरचं मी पाहतो. या वक्‍तव्याला उपस्थितांनी टाळ्यांनी प्रतिसाद दिला. आता तो व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्व बाजूंनी कुलगुरूंवर टीका होताना दिसत आहे. जबाबदारीचे पद असलेल्यांनी अशा प्रकारचे वक्‍तव्य करणे चुकीचे असल्याचे बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)