साध्वींनंतर सुमित्रा महाजन यांचे शहीद करकरेंविषयी वादग्रस्त वक्तव्य 

भोपाळ – मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले हेमंत करकरे यांच्या प्रकरणी उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केलेले वादग्रस्त वक्तव्य ताजेच असताना लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी करकरेंवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. यावेळी सुमित्रा महाजन यांनी काँग्रेस ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्यावर निशाणा साधला आहे.

सुमित्रा महाजन म्हणाल्या कि, कर्तव्य बजावताना एटीएस प्रमुख हेमंत करकरे शहीद झाले. पण, एटीएस प्रमुख म्हणून त्यांची भूमिका अयोग्य होती. त्या पुढे म्हणाल्या, हेमंत करकरे आणि दिग्विजय सिंह यांचे चांगले संबंध होते, असेदेखील त्यांनी आवर्जून सांगितले.

सुमित्रा महाजन यांच्या या वक्तव्यावर दिग्विजय सिंह यांनी ट्विटरद्वारे प्रत्युत्तर दिले आहे. सुमित्राताई, तुम्ही माझे नाव अशोकचक्र विजेते शहीद हेमंत करकरे यांच्याशी जोडल्याचा मला अभिमान आहे. तुमच्या साथीदारांनी त्यांना कायम अपमानित केले आहे. मात्र, करकरेंनी कायम देशहिताला प्राधान्य दिले. मुख्यमंत्री असताना मी सीमी आणि बजरंग दल यासारख्या संस्थांवर बंदी घालण्याची शिफारस केली. या गोष्टीचा मला अभिमान आहे. माझ्यासाठी देश सर्वात आधी आहे. राजकारण नाही, असे दिग्विजय सिंह यांनी म्हंटले आहे.

https://twitter.com/digvijaya_28/status/1122704331881320453

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)