मठातील वादावरून परस्परविरोधी तक्रारी दाखल

विणा मारल्याचा अध्यक्षांचा आरोप तर मठाधिपतींचा नकार  

विश्‍वस्त व मठाधिपती यांच्यातील सुरू असलेला वाद हा न्यायप्रविष्ट बाब बनलेला आहे. यावर न्यायालयाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत म्हणजेच दि. 30 एप्रिल 2019 अखेर न्यायालयाने निर्बंध घातलेले आहेत. त्यामुळे न्यायालयाचा निर्णय होण्यापूर्वीच संबंधित विश्‍वस्तांनी मठात जबरदस्तीने घुसून असा प्रकार करणे योग्य नाही.

बाजीरावमामा जगताप मठाधिपती

कराड – कराड शहरातील सुप्रसिद्ध असलेल्या मारुतीमामा कराडकर मठातील विश्‍वस्त व मठाधिपती यांच्यातील वाद हा न्यायप्रविष्ट बाब बनलेली आहे. मठाधिपती बाजीरावमामा कराडकर यांनी विश्‍वस्त यशवंत माने यांच्या डोक्‍यात विणा मारून जखमी केल्याची फिर्याद मंगळवारी रात्री शहर पोलीस स्टेशनला दाखल झाल्याने खळबळ उडाली. मात्र याबाबत मठाधिपती यांनी मी विणा मारला नसून विश्‍वस्तांनीच मला मारहाण करीत दमदाटी केल्याची तक्रार दाखल केली आहे.

याबाबत शहर पोलीस स्टेशनला परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आली आहे. मठाचे विश्‍वस्त मोहन चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, नाथाची दिंडी असल्याने मंगळवारी 23 एप्रिल रोजी मारुतीबुवा मठात तयारी सुरू होती. अध्यक्ष यशवंत दाजी माने, विश्‍वस्त मोहन चव्हाण, वारकरी अशोक किसन शिंगण हे दिंडीची तयारी करत होते. यावेळी बाजीरावमामा ओरडत तेथे आले. दिंडी कशी काढता ते बघतो असे म्हणून हुज्जत घालत यशवंत माने यांच्याकडे पाहून जगताप यांनी हातातील वीणा माने यांच्या डोक्‍यात मारला. त्यात ते जखमी झाले. विणेचे दोन तुकडे झाले. माने उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखम गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना सह्याद्री रुग्णालयात नेण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

तर मठाधिपती बाजीरावमामा कराडकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मंगळवारी यशवंत दाजी माने, मोहन नानासो चव्हाण सकाळी 9 वाजण्याचे सुमारास मारुतीबुवा कराडकर मठात आले. व बळजबरीने येथील दिंडी साहित्य ताब्यात घेण्यास सुरुवात केली. यावरून त्यांच्यात व माझ्यात शाब्दिक चकमक व वादावादी झाली. यावेळी यशवंत माने व मोहन चव्हाण या दोघांनी मला मारहाण करीत दमदाटी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, यावेळी झालेल्या झटापटीत विण्याचे दोन तुकडे झाले असून माझ्यावर खोटे आरोप केले जात असल्याचे बाजीरावमामा यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)