ठेकेदारांना मिळाली बिलांसाठी दोन दिवसांची मुदतवाढ

लेखा विभागाकडून दिलासा ः निवडणुकीमुळे 31 मार्चपर्यंतची मुभा

पिंपरी –
आर्थिक वर्षाचा शेवट जवळ येत असताना या वर्षातील बिले प्रलंबित तर राहणार नाहीत ना ? याची चिंता ठेकेदारांना सतावत होती. ठेकेदारांना लेखा विभागाकडून दोन दिवसांच्या मुदतवाढीच्या स्वरुपात मोठा दिलासा मिळाला आहे. बिले सादर करण्यास आणखी दोन दिवसांची म्हणजे 31 मार्चपर्यंत मुदतवाढ दिल्याचे मुख्यलेखा अधिकारी जितेंद्र कोळंबे यांनी स्पष्ट केले आहे.

चालू आर्थिक वर्षामधील कोणत्याही ठेकेदार किंवा पुरवठाधारकांची बिले प्रलंबित राहणार नाहीत. यासाठी बिले सादर करण्यास ठेकेदारांना 28 मार्चपर्यंत डेडलाईन लेखा विभागामार्फत देण्यात आली होती. मात्र, निवडणूक कामकाजामुळे अधिकारी, कर्मचारी व्यस्त असल्याने बिले सादर करण्यास आणखी दोन दिवसांची म्हणजे 31 मार्चपर्यंत मुदतवाढ दिेण्यात आली आहे. दरवर्षी ठेकेदार, पुरवठादारांकडून या आर्थिक वर्षाच्या अखेरीस बिले सादर केली जातात.

मात्र, 2018-19 च्या सुधारित अंदाजपत्रकानुसार उपलब्ध तरतुदींचा योग्यप्रकारे विनियोग होण्यासाठी चालू आर्थिक वर्षाची सर्व महसूली आणि भांडवली बिले 28 मार्चपर्यंत लेखा विभागाकडे सादर करण्याच्या सूचना आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी दिल्या होत्या. दरम्यान, निवडणूक कामाकाजात पालिकेचे अधिकारी, कर्मचारी व्यस्त आहे. त्यांच्याकडून ठेकेदारांना वेळेत बिले उपलब्ध होऊ शकलेली नाहीत. तसेच, पिंपरी-चिंचवड कॉन्ट्रॅक्‍टर्स असोसिएशनने महापालिका प्रशासनाशी पत्रव्यवहार करून मुदतवाढीची मागणी केली होती. त्यामुळे अखेर आणखी दोन दिवसांची मुदतवाढ बिले सादर करण्यास देण्यात आली आहे. त्यामुळे ठेकेदारांना 31 मार्चपर्यंत कामांची बिले सादर करता येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)